Home > Crime news > लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात,मानोरा येथील घटना

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात,मानोरा येथील घटना

Incident at Manora, in the trap of a corrupt villager ACB

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात,मानोरा येथील घटना
X

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात,मानोरा येथील घटना

मानोरा ता. ६, पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप (बु ) येथील ग्रामसेवक बालाजी भगवान सोनटक्के यांनी ८ हजार रुपयाची लाच दि. ६ जाने ला घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून लाचखोर ग्रामसेवकाला ताब्यात घेतले.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार मानोरा पंचायत समिती अंतर्गत येण्याऱ्या तळप बु येथील तक्रारदार वय 28 यांचे वडिलोपार्जित घराच्या मालमत्ताचे आठ अ बनवून देण्यासाठी ग्रामसेवक बालाजी भगवान सोनटक्के यांनी ८ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी वाशिम येथील लाच लूचपत प्रतिबंधक पथकाकडे दि ५ जानेवारीला तक्रार दाखल केली ५ जानेवारीला पडताडणी करण्यात आली ६ जानेवारीला दुपारी १ वा च्या दरम्यान पंचायत समितीच्या आवारात पंचा समक्ष आठ हजार रुपये लाच घेताना लाजखोर ग्रामसेवक यांना रंगेहात पकडून एसीबी पथकाने ताब्यात घेऊन मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आरोपी ग्रामसेवक बालाजी भगवान सोनटक्के यांच्या विरुद्ध कलम ७ ला,प्र,का १९८८ सुधारित कायदा २०१८ अन्वे अटक करण्यात आली ही कारवाई वाशिम लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक एन बी बोऱ्हाडे, पो हवालदार आसिफ शेख,पो ना नितीन तवलाकर,अरविंद राठोड, सुनील मुंदे, चालक वाजीत शेख यांनी कारवाई केली.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 6 Jan 2021 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top