लोहाराचे ठाणेदारासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
In the net of three ACBs, including a blacksmith
X
यवतमाळ- जामीन होण्यास मदत होईल, या हेतूने आरोपीच्या बाजूने 'से' पाठविण्यासाठी दहा लाखांची डिमांड करीत सात लाख रूपये स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोहारा ठाणेदारासह तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, दि. ७ डिसेंबरला शहरातील स्टेट बँक चौकातील डॉलर मोबाइल शॉपीत करण्यात आली. अनिल घुगल वय ५२ वर्ष असे लोहारा ठाणेदाराचे नाव असून खासगी व्यक्ती विद्युत वसानी रा. यवतमाळ आणि विशाल माकडे रा. यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, शहरातील लोहारा पोलिस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन होण्यास मदत होईल, असा 'से' पाठविण्यासाठी लोहारा ठाणेदार अनिल घुगल यांनी दहा लाख रूपये लाचेची मागणी केली. या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ठाणेदार अनिल घुगल यांनी सात लाख रूपये लाचेची मागणी करून स्विकारल्याचे मान्य केले. दरम्यान मंगळवार,दि. ७ डिसेंबरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता, ठाणेदार घुगल यांनी खासगी व्यक्ती विशाल माकडे याच्या मार्फत लाचेची रक्कम स्विकारली. तसेच खासगी व्यक्ती विद्युत वसानी याने सदर लाच स्विकारण्यास प्रोत्साहन दिलेे. त्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणेदार घुगल यांच्यासह त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.