शेवटी तिनेच घेतला बदला, अत्याचार करणाऱ्यावर न्यायालयात सपासप कटरने वार
In the end, she took revenge, stabbing the oppressor with a SAPS cutter in the court
M Marathi News Network | 15 Dec 2022 6:12 PM GMT
X
X
यवतमाळ लोकनायक वृत्तसेवा -: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच अनैतिक संबंधातून हत्येच्याही घटना वाढत आहेत. यातच यवतमाळ जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या आवारात आरोपीवर फिर्यादी महिलेने कटरने हल्ला केला. विशाल शेंडे असे आरोपीचे नाव आहे.
यवतमाळमध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये एका आरोपीवर महिलेने कटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशाल शेंडे असे जखमीचे नाव आहे. विशाल शेंडे हा एका महिलेवरील अत्याचार प्रकरणात आरोपी आहे. आज विशालची हजेरी न्यायालयात होती. यावेळी फिर्यादी महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने आरोपीवर कटरने वार करून हल्ला केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आवारात झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Updated : 15 Dec 2022 6:12 PM GMT
Tags: revenge stabbing oppressor SAPS cutter court
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire