Home > Crime news > जानेवारी २०२२ मध्ये वाशिम पोलीसांनी अवैध धंदयाविरूध्द केलेल्या धडाकेबाज कार्यवाही मध्ये ३७७ इसमांवर गुन्हे दाखल

जानेवारी २०२२ मध्ये वाशिम पोलीसांनी अवैध धंदयाविरूध्द केलेल्या धडाकेबाज कार्यवाही मध्ये ३७७ इसमांवर गुन्हे दाखल

In January 2022, Washim police filed a case against 377 people in a crackdown on illegal trade.

जानेवारी २०२२ मध्ये वाशिम पोलीसांनी अवैध धंदयाविरूध्द केलेल्या धडाकेबाज कार्यवाही मध्ये ३७७ इसमांवर गुन्हे दाखल
X


वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले.तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता,जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहाण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम,शस्त्र अधिनियम,दारुबंदी अधिनियम,जुगार, अवैध गुटखा प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना कायदयाचा बडगा दाखविला आहे.


वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईचे सत्र सुरु असताना, संपुर्ण जिल्हयात मा.पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह व अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात अवैध धंदयांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता पोलीस निरीक्षक एस.एम.जाधव, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे अधिपत्त्याखालील अधिकारी/अमलदार यांचे पथकाची वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईचे सत्र सुरु असताना मिळालेल्या गुप्त बातमी वरून कार्यवाही करण्यात आली ती खालील प्रमाणे- दिनांक २३/०१/२०२२ रोजी पोलीस स्टेशन रिसोड शहरा मध्ये धोबी गल्ली येथे जुन्या इमारती मध्ये वेगवेगळया कंपनीचा गुटखा सुनिल रामसुख तापडीया व इतर ०१ यांच्या कडे शासनाने प्रतिबंधीत केलेला सुंगधीत गुटखा किंमत अंदाजे १,५०,०००,०० (दिड कोटी )रूपयाचा असा मुददेमाल ,पोलीस स्टेशन मानोरा हददीतील ग्राम कुपटा येथील वरली मटका साहीत्य व नगदी १०३८५०/- रू व २० नग मोबाईल किंमत १३६५००/- रू असा एकुण २४०३५०/- रू ,पोलीस स्टेशन मंगरूळपीर हददीतील ग्राम मानोली येथे वरली मटका साहीत्य तसेच नगदी १६७५०/- रू, पोलीस स्टेशन मालेगांव हददीतील ग्राम पांग्राबंदी येथे सटटापटी बुक व नगदी ४८१०/-रू , पोलीस स्टेशन मालेगांव हददीतीलग्राम पिंपळवाडी येथील ५२ ताश पत्ते व नगदी रोख रक्कम ४६००/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वेगवेगळया पोलीस स्टेशनच्या हददीत अवैध वरली मटक्यावर छापे मारून एकुण २,६६,५१०/- रू एकुण ३९ इसम ,दिनांक २९/०१ / २०२२ रोजी पोस्टे मंगरूळपीर हददीतील ग्राम शेलुबाजार येथे एकुण १२ इसमांना पकडण्यात आले. त्यांचेकडुन वरली मटकाचे सट्टापट्टीचे साहित्यासह एकुण नगदी ३५३१०/-रुपये व १० मोटार सायकली किं. ३६००००/- व ९ मोबाईल किं.४००००/- व इतर साहित्यासह असा एकुण ४,३५,३१०/- रुपयाचा माल जप्त ,दिनांक २७/०१/२०२२ रोजी एकुण ०७ इसम वरली मटकाचे सट्टापट्टीचे साहित्यासह एकुण नगदी १,५८,६१०/-रुपये व २५ मोटार सायकली किं.८,६०,०००/- व ५ मोबाईल किं.४८०००/- व इतर साहित्यासह असा एकुण १०,६९,९७५/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला. दिनांक २८/०१/२०२२ रोजी रात्री उशिरा रिसोड शहरात विमल गुटखा,नजर गुटखा,माझी गुटखा व आर जे गुटखा असा एकुण ८४,४५०/- रूपयाचा मुददेमाल मिळुन आला ,दिनांक ३१/०१/२०२२ रोजी पोस्टे धनज हददीमध्ये ग्राम कामरगांव येथे एकुण ६ इसम वरली मटकाचे सट्टापट्टीचे साहित्यासह एकुण नगदी ३७६०/-रुपये ३ मोबाईल किं.५५००/- व इतर साहित्यासह असा एकुण ९२६०/- रुपयाचा माल मिळून आला.


तसेच इतर सर्व पोलीस स्टेशन स्तरावर दारूबंदी,जुगार व गुटख्याचे केसेस करण्यात आले असुन त्यामध्ये वेगवेगळया आरोपींतावर कार्यवाही करण्यात आली.जुगार च्या केसेस मध्ये २०६ आरोपी ,दारूबंदी मध्ये १६८ आरोपी व गुटखा विक्री मध्ये ०३ आरोपी असे ३७७ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जानेवारी २०२२ मध्ये सर्व पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथक यांनी वाशिम जिल्हयात जुगार च्या केसेस मध्ये २०६ आरोपी ,दारूबंदी मध्ये १६८ आरोपी व गुटखा विकी मध्ये ०३ आरोपी असे एकुण ३७७ इसमांवर वेगवेगळया कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 2 Feb 2022 8:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top