Home > Crime news > वाशिम जिल्हयामध्ये अवैध रित्या झाडांची कटाई; ५५ लक्ष रुपयाचा मुददेमाल जप्त

वाशिम जिल्हयामध्ये अवैध रित्या झाडांची कटाई; ५५ लक्ष रुपयाचा मुददेमाल जप्त

Illegal logging in Washim district; Material worth Rs 55 lakh confiscated

वाशिम जिल्हयामध्ये अवैध रित्या झाडांची कटाई; ५५ लक्ष रुपयाचा मुददेमाल जप्त
X

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक सो श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याचा चंग बांधला आहे.रोज नविन कारवाई करुन अवैध धंदे करणाऱ्या इसमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांना वाशिम जिल्हयात अनसिंग येथे अनसिंग ते पिंपळगाव रोडवरील खडसिग गावाजवळील शेत शिवारातुन आडजातीच्या झाडाची तस्करी करीत असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने त्याची खात्री करुन कारवाई करण्याबाबत पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सोमनाथ जाधव यांना आदेशित केले.

दिनांक ०९/०२/२०२२ रोजी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी एक पथक तयार करुन मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश सपोनि प्रमोद इंगळे यांना दिले. सपोनि इंगळे यांनी त्याचे पथक व पंचासह मिळालेल्या माहितीच्या आधारे आपले पथकासह अनसिंग ते पिंपळगाव रोडवरील खडसिंग गावाजवळील शेत शिवारातुन बेहडा या आडजातीच्या झाडाचे खोड विनापरवाना बेकायदेशीररित्या कटाई करुन क्रेन क्रमांक एमएच १४ सिएम ०४५० च्या सहाय्याने १० टायरचा ट्रक क्रमांक एमएच ४० बी एम ३६६४ मध्ये बेकायदेशीर पणे भरुन छुप्यामार्गाने वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने पंचासमक्ष ट्रक चालक याचे नाव पत्ता विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव रियाज अली रसुल मोहम्मद, वय ३२ वर्षे रा नुर नगर दारव्हा, जि यवतमाळ व क्रेन चालक संदिप गजानन खडारे वय २५ वर्षे, रा दत्तनगर, अल्लाडा प्लॉट, वाशिम यांचे ताब्यात ट्रक क्रमांक एमएच ४० बी एम ३६६४ मध्ये आडजातच्या झाडाचे खोड अंदाजे ४०० घनफुट, एमएच १४ सिएम ०४५० क्रमांकाची क्रेन असा एकुण ४२,००,०००/-रु चा माल मिळुन आला तर अनसिंग ते राजगाव रोडवरील उकळीपेन गावाजवळील शेत शिवारातुन १२ टायरचा ट्रक क्रमांक एमएच २६ ए डी.०४०९ यांचा चालक शेख यासीन शेख गुलाब, वय ४२ वर्षे रा वसंतनगर, पुसद जि यवतमाळ यांचे ताब्यातुन बेकायदेशीरपणे भरुन छुप्या मार्गाने आडजातच्या झाडाचे खोड अंदाजे २०० घनफुट एकुण १३,००,०००/- रुपये असा एकुण ५५,००,०००/-( पंचावन्न लक्ष ) रुपयाचा मालाबाबत नमुद दोन्ही ट्रकचालकाजवळ बेहडा या आडजातीचे लाकडाचे वाहतुकीबाबत कोणताही परवाना किंवा पास नसल्याने सदर लाकडाबाबत इतर कोणतेही वैध कागदपत्र सादर केले नसल्याने पंचासह नमुद माल जप्तकरण्यात करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन आसेगाव येथे ठेवण्यात आले असुन नमुद वाहन ट्रक व क्रेन चालक/मालक यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता वनविभागास पत्र व्यवहार करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रमोद इंगळे, पोहेका किशोर चिचोळकर पोना अमोल इंगोले,प्रविण राऊत,पोकॉ संतोष शेणकुडे यांनी सहभाग नोंदविला आहे.

वाशिम जिल्हयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता अशाप्रकारच्या अवैध धंदे करणाऱ्या इसमाची माहिती असल्यास न घाबरता पुढे यावे माहिती सांगणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल आवाहन मा. पोलीस अधिक्षक यांनी वाशिमकर जनतेस केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 11 Feb 2022 6:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top