Home > Crime news > भिसी येथे लावा पक्षाची अवैध शिकार..

भिसी येथे लावा पक्षाची अवैध शिकार..

Illegal hunting of lava birds at Visi

भिसी येथे लावा पक्षाची अवैध शिकार..
Xअनिल रेवतकर,

भिसी अप्पर तालुका,जि, चंन्द्रपुर

मो.न. ९०४ ९५ २७ ९०४


भिसी :-- येथील मटण मार्केट मध्ये वन्यपक्षी लावा या पक्षाची खरेदी- विक्री होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे भिसी वनपरिमंडळ अधिकारी संतोष औतकर तथा त्यांच्या वन कर्मचाय्रांनी मुख्य बाजार चौकातील भिसी येथील चिकन मार्केट मधिल घनश्याम चिंतामण शिवरकर यांच्या दुकानात धाड मारली असता काही इसम लावा पक्षाची खरेदी- विक्री करून त्याचे मास घरी नेऊन खाण्याच्या तयारीत असतांना वनविभागाने पकडले .

काही इसम लावा पक्षी ( लावे ) ची खरेदी- विक्री करून घनश्याम चिंतामण शिवरकर याचे दुकानात बारीक करीत असल्याची माहिती मिळाली.यावरून वन अधिकारी संतोष औतकर, वनरक्षक भानुदास बोरकर, यांनी दकानात जावून धाड मारली असता लावा पक्षाची विक्री करणारे व्यक्ती पळून गेले.तर खरेदी करणारे किशोर गुलाब पिसे चिमुर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी ,वय ४१, व सुरीने चर्या पक्षाचे गळे कापून त्याचे पंख व पिसे काढून बारीक करण्याच्या बेतात असतांनाच रंगेहाथ पकडण्यात आले. विस्तार अधिकाय्रासह घनश्याम चिंतामण शिवरकर,संबा शिवरकर, आणि कत्तल करणारा असपाक पठाण या चौघांवर वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६) ९ , १६ , ५१ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.ही कार्यवाही उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा , सहाय्यक वनसंरक्षक वाकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आर एफ ओ उध्दव नैताम , वनपरिमंडळ अधिकारी संतोष औतकर, वनरक्षक भानुदास बोरकर, अमोल झलके यांच्या पथकाने आरोपीवर कारवाई करून वन्यजिव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

लावे खरेदी करणे आले अंगलट - भिसी येथील चिकन मार्केट मध्ये चिमुर पंचायत समितीचे ( शिक्षण ) विस्तार अधिकारी किशोर पिसे यांना लावा ( लावे ) खरेदी करणे चांगलेच अंगलट आलेले आहे,भिसी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची गावात होताच चिकन मार्केट परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. वनविभागाच्या धडक कारवाईमुळे

लावे विक्री - खरेदी करणाय्रांचे आता चांगलेच धाबे दणाणलेले आहे.

Updated : 16 Dec 2021 8:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top