चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पायावर केला चाकूने वार ...पत्नी गंभीर जखमी आरोपी पती फरार...
Husband stabs wife in the leg on suspicion of character ... wife seriously injured accused husband absconding ...
X
पालघर प्रतिनिधी :वैभव पाटील
पालघर जिल्हा वृत्तांत : सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोडखड देऊळपाडा येथे राहणाऱ्या पतीने पत्नीच्या पायावर चाकुने वार केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ममता शंभुनाथ शाहु वय वर्ष(३८) असे पत्नीचे नाव असून जखमी अवस्थेत तिला सफाळे येथील पार्थ या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .या घटने नंतर पती शंभुनाथ बाबुला शाहु हा फरार झाला आहे. सफाळे पोलीस ठाण्यात शंभुनाथ विरोधात मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपी शाहूचा शोध घेत आहेत.
सफाळे पुर्व भागातील रोडखड देऊळपाडा येथे शंभुनाथ बाबुलाल शाहु हे परिवारांसह राहतो. पत्नीचे दुसऱ्या पुरुषाची अनैतिक संबंध आहेत या
संशयाच्या कारणावरून नवरा-बायको मध्ये अनेक वेळा वाद निर्माण झाले होते. चारित्र्याच्या संशयावरून शंभुनाथ यांने मनात राग धरून मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सर्व झोपले असताना पत्नी ममता हिच्या पायावर चाकुने वार करुन पळ काढला. या घटनेची सफाळे पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळ रोडखड देऊळपाडा येथे भेट देऊन सफाळे पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या पत्नीला पार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू असून आरोपी पतीचा सफाळे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली कसून शोध घेत आहे.