Home > Crime news > मृतक महिलेचा पती फरार; कुटुंबीयांची माहिती.

मृतक महिलेचा पती फरार; कुटुंबीयांची माहिती.

Husband of deceased woman absconding; Family information.

मृतक महिलेचा पती फरार; कुटुंबीयांची माहिती.
X

आशिष सुनतकर

म मराठी न्यूज नेटवर्क

उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

मो. 7030081037

आल्लापल्ली:- येथील प्रभाग क्र. २ मधील भेदके वाडा वस्तीत आज दि.३१ में रोजी एका माहितीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून सदर हत्या काल दि.३० में रोजी दुपारच्या १२ ते ३ च्या दरम्यान झाली असावी असा अंदाज घरमालकाने दिल आहे. मृतक महिलेचे नाव सुशिला गोपीचंद मडावी वय ४३ असे असून हि महिला भामरागड तालुक्यातील कोठी येथील असून ते आपल्या पती सोबत आल्लापल्लीत मागील दोन महिन्यांपासून वास्तव्यास राहत होती आणि आपल्या कुटुंबाचे उदारनिवार्हसाठी रोजंदारीच्या कामावर जात होती. दरम्यान आज दि. ३१ में रोजी घर शेजारच्यांना दुर्गंध वास आल्यामुळे काही नागरिकांनी घराचे दार उघडले असता महिलेचा मृतदेह आढळला आणि याबाबतची माहिती पोलीस स्टेशन अहेरी येथे देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

मृतक महिलेचा पती फरार असून या घटनेचे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे करत आहे.

Updated : 31 May 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top