Home > Crime news > हिंगणघाट येथील घरफोडीचे अट्टल सराईत चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात.

हिंगणघाट येथील घरफोडीचे अट्टल सराईत चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात.

Hinganghat police nab burglary in Nagpur.

हिंगणघाट येथील घरफोडीचे अट्टल सराईत चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात.
X
हिंगणघाट दि.६

शहरातील संत तुकडोजी वार्ड परिसरात एकाच रात्री तब्बल ४ घरी घरफोड़या करुन सोन्याचांदीचे दागिन्यासह नगदी रक्कम लंपास केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी नागपुर येथील रहिवासी असलेल्या दोन सराइत गुन्हेगारांना अटक करण्यात आली.त्यांचेकडून सोन्याचांदीचे दागिने व नगदी रक्कमेसह ४९ हजार,९६० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.

सदर गुन्हेगारांवरती चंद्रपुर,भंडारा,नागपुर जिल्ह्यात अनेक चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

नागपुर येथील घरफोडीचे अट्टल सराईत चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३ ते ४ जुलै रोजी रात्री शहरातील संत तुकडोजी वार्ड,येथे एकाच रात्री येथील रहिवासी उमेश उत्तम फुलकर, सिद्धार्थ काशिनाथजी गायकवाड ,श्रीमती राणी विलास झाडे तसेच दिपक गायधने यांच्या

घरी अज्ञात चोरटयांनी घरफोड्या केल्याची तक्रारी हिंगणघाट पोलिसांत दाखल करण्यात आल्या.

माहीती मिळताच लागलीच पोहवा शेखर

डोंगरे यांचे पथकाने परिसरात आरोपी व चोरीचा मालाचा शोध घेत असता त्यांच्या पथकांन माऊली पार्क, हिंगणघाट येथे दोन संशयीत इसमांना ताब्यात

घेतले, त्यांना पोलिसी ख़ाकया दाखवून चौकशी केली असता त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेल्या मालापैकी नगदी रक्कम,सोन्याचे दागिणे व जेन्ट्स घड्याळ जप्त केले.व त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली.चौकशीकरीता त्यांना स्थानिक न्यायालयाने ३ दिवस पोलिस कोठड़ी मंजुर केली,या काळात चौकशी दरम्यान

गुन्हयाचा चोरीस गेलेला माल सोन्याचे व चांदीचे दागिणे तसेच नगदी रक्कम असा एकुन ४९ हजार ९६० रुपयाचा

मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर गुन्हयात अटक करण्यात आलेले आरोपी राहुल कमल माणिकपुरे(२८) वर्षे रा. योगी अरविंद नगर,यशोधरा चौक, नागपूर, नितेश अशोक गिरावकर(२०)रा.

गिट्टी खदान,नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले होते.

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा शेखर डोंगरेनापोशी. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विषाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली.


Updated : 2021-07-06T18:55:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top