Home > Crime news > तलवारसदृश हत्याराने गुरुनाम सिंग भादा याला गंभीर जखमी केले.

तलवारसदृश हत्याराने गुरुनाम सिंग भादा याला गंभीर जखमी केले.

Gurunam Singh Bhada was seriously injured by a sword-like assassin.

तलवारसदृश हत्याराने गुरुनाम सिंग भादा याला गंभीर जखमी केले.
Xहिंगणघाट दि.१२ मार्च

स्थानिक दत्तमंदिर वार्ड येथील बसस्थानक परिसरात आरोपी संतोष सिंग भादा (४३) याच्यासह सुरेश सिंग,गोलु भादा इत्यादीआरोपींनी तलवारसदृश हत्याराने गुरुनाम सिंग भादा याला गंभीर जखमी केले.

या हल्ल्यात फिर्यादी गुरुनाम सिंग गंभीर जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरानी प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविले.

हिंगणघाट पोलिसांनी आरोपी विरुध्द भादंवी ३०७ तसेच विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला असून पोलिसानी आरोपींना अटक करीत न्यायालयात हजर केले,सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पाटणकर करीत आहे.

Updated : 13 March 2022 1:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top