गावठी हातभट्टीचा दारुचा अड्डा केला ऊध्वस्त
एसडिपिओ यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांची धडाकेबाज कारवाई
X
(फुलचंद भगत)
वाशिम:-मंगरुळपीरचे ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेंबडे,पोशि अमोल ठाकरे, आसेगव पोलिस स्टेशन चे मपोशी सुलताना सय्यद ,पोशी बापूराव चव्हाण, मंगेश गादेकर यांनी अनसिंग पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम उकळी पेन येथे अवैधरीत्या गावठी दारू विकणारे इसम प्रकाश सोपान धवसे याचेवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून 35 लिटर गावठी दारू व 15 लिटर हातभट्टी साठे लागणारे काच्चे रसायन मोह, सदवा असे अंदांजे 5500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला व याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले.
ऊपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी आपला प्रभार स्विकारल्यापासुन ऊपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत धडाकेबाज कारवाया केल्या आहेत.एसडिपिओ यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने अनसिंग पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रभारी अधिकारी श्री तुषार जाधव साहेब तसेच मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेंबडे, अनसिंग पोलीस स्टेशन पिएसआय तले, पोना चित्ताकवर,पोशी गडदे,मंगरुळपीर पोलिस स्टेशन चे पोशि अमोल ठाकरे, आसेगाव पोलिस स्टेशन चे मपोशी सुलताना सय्यद ,पोषी बापूराव चव्हाण अश्यानी अन्सिंग पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम मोहगवन येथील ई क्लास जमिनीवर तळ्याच्या काठाला अवैधरीत्या गावठी हातभट्टी साठे लागणारे काच्चे रसायन मोह, सडवा असे अंदांजे 2500 लिटर किंमत अंदाजे 100 लिटर प्रमणे 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206