Home > Crime news > उचगावात जुगार अड्ड्यावर छापा सुमारे ९५ हजाराचा मुद्देमाल गांधीनगर पोलिसांकडून जप्त

उचगावात जुगार अड्ड्यावर छापा सुमारे ९५ हजाराचा मुद्देमाल गांधीनगर पोलिसांकडून जप्त

Gandhinagar police seize gambling den in Uchgaon

---------------------------------------------------

म,मराठी डिजीटल टीम, मुंबई

Updated On -08:25 Pm

San, 5,August ,2021

Edited By: उदय साळुंखे

मो.नं 8623068620------------------------------------------------------

कोल्हापूर (प्रतिनिधी):-

उचगाव ता .करवीर येथे

तीन पानी पत्यांचा जुगार खेळताना कोविड - १९ अधिनियम,आपत्ती व्यवस्थापन कोविड विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून न मास्क लावता तीन पानी जुगार खेळताना गांधीनगर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम ६८१३० रुपये व पाच मोबाईल हँडसेट असा एकूण ९४८३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याप्रकरणी सात जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

निखिल रामचंद्र जाधव (वय ३७ रा.जानकीनगर उचगाव ),पुंडलिक पांडुरंग वाईंगडे(वय५३रा.मंगेश्वर कॉलनी उचगाव ),सुजित सुभाष पाटील(वय३७ रा.कागल),विनोद दिनकर यादव(वय३८ नागदेववाडी),सुरेश बाळू काटे (वय ४४रा.टेंबलाईवाडी कोल्हापूर ),अर्जुन शिवाजी कारंडे (वय४१ रा.टेंबलाईवाडी),कृष्णात भोगम-कागले (रा.उचगाव )अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.अजुन कृष्णात भोगम याला अटक झालेली नाही तर सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी उचगाव येथे शाळेजवळ भरवस्तीत कृष्णात कागले याच्या घरात जुगार खेळत असल्याची सपोनि सत्यराज घुले यांना माहीती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून संशयिताना ताब्यात घेतले .याबाबत पोलिस नाईक आकाश संभाजी पाटील यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली.अधिक तपास पोलिस हवालदार मोहन गवळी करीत आहेत.

Updated : 5 Sep 2021 6:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top