कोल्हापुरातील रूईकर कॉलनी सिग्नल जवळ कार मधून अज्ञात चोरट्याकडून चार लाख रुपये लंपास.
Four lakh rupees from an unidentified thief in a car near Ruikar Colony signal in Kolhapur
X
कोल्हापूर प्रतिनिधी शशिकांत कुंभार
_________________________ बुधवार दिनांक १/०९/२०२१
_________________________कोल्हापूर: रेल्वे स्टेशन रोडवरील अशोका टायर चे मालक चेतन मेहता आपली मारुती कार MH 09 DX 4035 मधून सोबत
आपल्या दुकानातील रोख चार लाख रुपये घेऊन दिनांक 31/08/2021 रोजी संध्याकाळी 745 वा आपल्या भावाचे दुकान रुईकर कॉलनी येथील सिएट टायरमध्ये आले होते दुकान समोरून बंद असल्यामुळे त्यांनी दुकानाच्या मागून आपल्या भावाच्या ऑफिसमध्ये पंधरा मिनिटे बोलून बसले पंधरा-वीस मिनिटांच्या चर्चेनंतर ते आपल्या गाडी जवळ आले असता त्यांना आपल्या गाडीची ड्रायव्हर साईडची काच फोडून गाडीतील रोख चार लाख रुपयाची रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ शाहूपुरी पोलीसाची तात्काळ संपर्क साधून घडलेला प्रकार पोलीस स्टेशनच्या कानी घातला हा प्रकार समजताच शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी साहेब व गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पोलीस निरीक्षक प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व घटनेची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशनमघ्ये अज्ञात इसमा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झालेले असून पोलीस शाहुपुरी पोलीस टीव्ही द्वारी अज्ञात चोरट्याचा तपास करीत आहेत सदर गुन्ह्याची अज्ञात इसमाने टिप दिल्याची व पाठलाग करून रक्कम चोरल्याची ही शक्यता नाकारता येत नाही