यवतमाळात दोनशेच्या बनावट नोटासह चौघांना अटक
Four arrested with fake Rs 200 notes in Yavatmal
X
यवतमाळ- बनावट भारतीय चलन बाळगून त्याची शहरात विक्री करणाऱ्या चौघांना एलसीबी पथकाने अटक केली. ही कारवाई शहरातील पांढरकवडा मार्गावर मंगळवार, दि. १० मे रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून ९६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सय्यद वसीम सय्यद जमील वय २३ वर्ष बिलाल नगर, कोहिनूर सोसायटी, वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा वय २७ वर्ष रा. पाटील ले-आऊट, दानीश शहा तयब शहा वय १९ वर्ष रा. सुंदर नगर, भोसा आणि शाकीब हमीद अकबानी वय २१ वर्ष रा. मेमन कॉलनी, यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. काही युवक खऱ्या नोटांच्या बदल्यात २०० रूपयाच्या दुप्पट बनावट नोटा विक्री करीत होते. तसेच मंगळवारी ते युवक पांढरकवडा परिसरात त्या नोटा विक्री करण्याकरिता येणार होते. याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यावरून मंगळवारीच रात्री एलसीबीचे एक पथक तयार करून पांढरकवडा मार्गावर सापळा रचण्यात आला. यावेळी सय्यद वसीम सय्यद जमील, वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा आणि दानीश शहा तयब शहा आदी तिघे संशयास्पद पोलिसांनी १०८ नग २०० रूपयांच्या नोटा, दोन दुचाकी, चार मोबाईल असा एकूण ९६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे, विवेक देशमुख, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, सागर भारस्कर, कर्मचारी बंडु डांगे, महंमद चव्हाण, हरिष राऊत, नीलेश राठोड, विनोद राठोड, सुधीर पिदुरकर, किशोर झेंडेकर, महेश नाईक, सलमान शेख, मोहम्मद भगतवाले, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी यांनी पार पाडली.