Home > Crime news > कोट्यावधीच्या बॅंक घोटाळ्यातील चार आरोपी जेरबंद;मंगरुळपीर येथील प्रकरण

कोट्यावधीच्या बॅंक घोटाळ्यातील चार आरोपी जेरबंद;मंगरुळपीर येथील प्रकरण

Four accused in multi-crore bank scam arrested; case at Mangrulpeer

कोट्यावधीच्या बॅंक घोटाळ्यातील चार आरोपी जेरबंद;मंगरुळपीर येथील प्रकरण
X

मंगरुळपीर:-सन २०१८ मधील बहूचर्चेत असलेल्या मंगरुळपीर येथील एका खाजगी कोट्यावधीच्या बॅंक घोटाळ्यातील चार आरोपी पोलिसांनी दि.१ जुर्ले रोजीच्या राञी साडेदहाच्या सुमारास जेरबंद केले आहे.

ठेविदारांनी लाखोंची ठेव ठेवून एका खाजगी बॅंकेवर विश्वास ठेवून आपले खाते ऊघडले होते परंतु अल्पावधीतच खातेदारांना कोट्यावधीचा चुना लावून गाशा गुंडाळलेल्या एका खाजगी बॅंकेच्या विरोधात सन २०१८ ला गुन्हा नोंद केला होता.त्या दिशेने पोलिस तपासही करत होते शेवटी दि.१ जुर्लेच्या राञी साडेदहाच्या सुमारास या प्रकरणातील दोषी नितिन नामदेवराव सुर्वे रा.सोनखास मंगरुळपीर,मंगेश गुलाबराव राऊत रा.वाळकी मालेगाव,नामदेव तुकाराम भगत रा.मोझरी मंगरुळपीर,सतिष पोपटराव काळे रा.टाकळी निफाड नाशिक या चार आरोपिंना पोलिसांनी जेरबंद केले असुन अपराध क्र.२६९/२०१८ भांदवि कलम ४२०,४०९/३४ नुसार गुन्हा दाखल केला असुन सदर आरोपिंना आर्थीक गुन्हे शाखेचे एपिआय ऊदय सोयस्कर यांनी अटक केली आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.

प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 2 July 2021 7:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top