दिपकराज डोंगरे हत्या प्रकरणात चार आरोपी अटकेत इतर आरोपींचा शोध घेत आहे ग्रामीण पोलीस
Four accused arrested in Deepakraj Dongre murder case
X
मूर्तिजापुर तालुका विशेष प्रतिनिधी
अकोला / मुर्तीजापुर : शहरातील प्रतिक नगर मध्ये राहणारे केंद्रप्रमुख व शिक्षक दीपक डोंगरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत करण्यात आले आहे
मुर्तिजापूर तालूक्यातील समशेरपूर येथे दुहेरी हत्याकांड घडलंय. हत्याकांडात धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांच्यावर दीपक डोंगरे यांनी चाकू हल्ला करून जागीच ठार केले होते. तर मारेकरी दिपकराज डोंगरे याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. काल सकाळी दहाच्या दरम्यान ही घटना घडलीय. डोंगरे यांनी धम्मपाल याच्या गावी जाऊन घरातच हल्ला केलाय. यात धम्मपाल याचा जागीच मृत्यू झालाय.
तर धम्मपालच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात दिपकराज डोंगरे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी अकोला येथे नेत असताना त्यांचा तर त्याचा मृत्यू झाला . मृतक धम्मपाल औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचा सक्रीय कार्यकर्ता होता. तर दिपकराज डोंगरे अॅक्शन फोर्स शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होतेय डोंगरे यांचे विरुद्ध ग्रामीण पोलिसांनी कलम 302 452 504 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सर दीपक राज डोंगरे यांच्या हत्या प्रकरणातील फिर्यादी पूजा डोंगरे यांनी दिल्याने सदर प्रकरणात आरोपी आदेश उर्फ धम्मपाल आटोटे महादेव आटोटे, इंदुबाई आटोटे, विनोद आटोटे व इतर 7 ते आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर इतर पैकी चार आरोपी मध्ये संतोष आटोटे जितेंद्र आटोटे शत्रुघन आटोटे विजय आटोटे यांना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींचा शोध ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक रहीम शेख पीएसआय रत्नपारखी घेत आहे दीपक डोंगरे हत्याप्रकरणातील पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 143 147 148 149 504 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे
.