Home > Crime news > फिल्मी स्टाईल ने टाकला गोल्ड लोन देणाऱ्या बैंकेत दरोडा मेनेजरच निघाला दरोड्याचा मास्टरमाईंड

फिल्मी स्टाईल ने टाकला गोल्ड लोन देणाऱ्या बैंकेत दरोडा मेनेजरच निघाला दरोड्याचा मास्टरमाईंड

Film-style robbery at a gold loan bank The manager is the mastermind of the robbery

फिल्मी स्टाईल ने टाकला गोल्ड लोन देणाऱ्या बैंकेत दरोडा    मेनेजरच निघाला दरोड्याचा मास्टरमाईंड
X

फिल्मी स्टाईल ने टाकला गोल्ड लोन देणाऱ्या बैंकेत दरोडा

मेनेजरच निघाला दरोड्याचा मास्टरमाईंड

यवतमाळ/वर्धा येथील एका खाजगी बँकेतुन सोने लुटणाऱ्या गैंगला पोलिसांनी अटक केली आहे,यात यवतमाळ शहरातील 3 आरोपिनचा समावेश असून या गैंग कडून वर्धा येथील मुथूट फिनकॉर्प या बैंकमधुन लुटन्यात आलेले 9 किलो पेक्षा अधिक सोने व लाखो रूपयांची रक्कम पोलिसांनी घटनेच्या काही तासातच रिकवर करीत सर्व आरोपिना अटक केली,वर्धा पोलिसांनीमहेश अजाबराव श्रीरंग 35 बहादुरा फाटा उमरेड रोड नागपूर पोस्ट अॉफीस सेलुया कार्रवाईला अंजाम दिला असून,दोन दिवसांपूर्वी हा दरोडा टाकन्यात आला होता,मात्र घटनेच्या काही तासांच्या आत या सर्व आरोपिना यवतमाळ नजिकच्या करलगाव घाटात पकडण्यात पोलिसांनी यश मिळविले,यानंतर पोलिसांनी गुरुवारी या कार्रवाई बाबत माहिती दिली,यात,या सोने चोरी प्रकरणात मुथूट फिनकॉर्प या खासगी बँकेचा मेनेजरच मास्टरमाइंड होता, त्यानेच अन्य आरोपिना सोबत घेवून आपल्याच बैंकेत सोने लूटण्याचा कट रचला होता,या गैंगला अटक केल्यानंतर ही खळबळजनक माहिती समोर आली.पकडण्यात आलेल्या आरोपी मध्ये बँकेचा मैनेजर महेश अजाबराव श्रीरंगे राहणार यवतमाळ,सध्या तो बहादुरा फाटा उमरेड रोड नागपूर पोस्ट अॉफीस सेलु येथे राहत होता,या व्यतिरिक्त पकडलेल्या आरोपिनमध्ये कुणाल धर्मपाल सुंदर 36 उज्वल नगर,जीवन बबनराव गिरड कर 36 दर्डानगर यवतमाळ व कुशल सरदार आगासे कोल्हे ले ऑउट यवतमाळ याचा समावेश आहे.यात एक आरोपी यवतमाळ येथील भूखण्ड घोटाळ्यात सामिल असून एक फार्मासिस्ट असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरात मुख्य मार्गावर असलेल्या मुथूट फायनान्स या गोल्ड लोन देणाऱ्या बँकेवर 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला होता महिला कर्मचारी वर पिस्तौल रोखुन व कर्मचार्याना चाकूचा धाक दाखवित तिजोरित असलेला कोट्यावधीचा सोना व लाखो रूपयांची रोख रक्कम लूटून हे सर्व आरोपी तेथून फरार झाले होते,यानंतर या दरोडयाची तक्रार वर्धा पोलीस देण्यात आली होती, वर्धा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप यांनी तीव्र गतीने तपासाची चक्रे फिरवीत बँकेत जाऊन आढावा घेतला यानंतर बँक व्यवस्थापक महेश श्रीरंगे याची चौकशी केली तेव्हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आले,वर्धा येथील एलसीबी पोलीस पथकाने तात्काळ आरोपींचे लोकेशन काढत त्यांना यवतमाळ येथील यवतमाळ करळगाव घाटातुन फरार होत असताना ताब्यात घेतले,या कार्रवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून 9 किलो पेक्षा अधिक सोने व बाँकेतून लुटलेली 3 लाख रूपयांची रोख रक्कम हस्तगत करीत व्यवस्थापक महेश श्रीरंगे व अन्य सर्व आरोपिना अटक करण्यात आली, विशेष म्हणजे बैंकेत असलेल्या महेश श्रीरंगे याने यवतमाळ येथील या तरुनाना घेवून बैंकेत दरोडा टाकन्याचा कट रचुन याला अंजाम दिल होता अशी माहिती वर्धा पोलिसांनी दिली आहे.
Updated : 18 Dec 2020 1:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top