जातिवाचक शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोघांविरुध्द विविध कलमान्यये गुन्हे दाखल
Filed various criminal charges against the two for threatening to kill them with racist insults
X
मंगरूळपीर-कारंजा ते मालेगाव रोडचे डांबरीकरणाचे काम सुरु असुन ते व्यवस्थित सुरु नाही त्यामुळे सबंधितांना चांगल्या प्रतिचा रोड करन्याची विनंती केल्यामुळे जातीवाचक शिविगाळ करत जिवे मारन्याची धमकी दिली सामाजिक कार्यकर्ते सचिन बाबुलाल डोफेकर यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द २९४,५०६,३४अन्वये गुन्हा दाखल करन्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार फिर्यादी सचिन बाबुलाल डोफेकर हे सामाजीक कार्यकर्ता असुन जि.प.सदस्या यांचे चिरंजिव आहेत.कारने जात असतांना पेडगाव गावचे नजिक पुलाजवळ रोडचे डांबरीकरणाचे काम सुरु होते. त्या ठिकाणी रोडचे काॅन्र्टॅक्टर प्रभाकर दुर्योधन जवादे तसेच पांडे रा.जालना हे दिसल्यावर सुरु असलेल्या कामात मटेरिअल योग्य प्रमाणात नसुन चांगले काम करन्याविषयी विनंती केली असता वरिल नमूद ठेकेदारांनी जातीवाचक शिविगाळ करत जिवे मारन्याची धमकी दिली अशा फिर्यादीवरुन प्रभाकर दुर्योधन जवादे आणी पांडे या दोघांवर भांदवी कलम २९४,५०६,३४ अन्वये गुन्हा नोंद करन्यात आला असुन पुढील तपास मंगरूळपीर पोलिस करीत आहेत.