कोरोना बाबतच्या नियमांचा भंग करणाऱ्या रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल
Filed a case against the resort owner for violating the rules regarding Corona
X
पालघर जिल्हा प्रतिनिधी
संजय लांडगे
रविवारच्या सुट्टीचा आनंद उपभोगण्याच्या उद्देशाने येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसॉर्ट व वॉटर पार्कचे मालक राजरोसपणे रिसॉर्ट चालू ठेऊन कोरोना बाबतच्या नियमांंचा भंग करत असल्याचे आढळल्याने वाड्यातील एका रिसॉर्ट मालकावर वाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोना महामारीचा प्रभाव ओसरला असला तरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अजूनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापराने, सॅनिटायझर वापराने या नियमांसह राज्यात दिवसा जमाव बंदी व रात्री संचार बंदी लागू केली आहे असे असले तरी वाड्यातील कंचाड येथील मयूरवन हे रिसॉर्ट चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने शनिवारी (दि.१०जुलै) पोलीस निरीक्षक सुधिर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड यांनी गोर्हे दुरक्षेत्राचे सहा.फौज गोंजारी , पोना.पाटील , पोशि.जाधव , पोशि.धानके यांच्यासह मयूरवन रिसॉर्टला भेट दिली असता या ठिकाणी शंभर ते सव्वाशे पर्यटकांची गर्दी दिसून आली. कोविड -१९ चे महाराष्ट्र शासनाचे निर्बंध लागु असताना तरणतलावाचा वापर करुन हे पर्यटक संगिताच्या तालावर नृत्य करत असताना मिळुन आले . यावेळी लहान मुले , स्त्री पुरुष असे एकत्र असताना कोणीही मास्क घातलेले नव्हते मयुरवन क्लब अँँन्ड हॉलीडे रिसॉर्ट चे मालक व चालक यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन, साथ रोग नियंत्रण कायद्याप्रमाणे वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाउपनिरी - रुपाली गुड हया करत आहेत.