सावर येथे शेतकऱ्यांची आत्महत्या
Farmer commits suicide at Savar
zakir.hussain | 19 Sep 2021 1:36 PM GMT
X
X
बाभूळगाव ता प्र शहजाद शेख जी यवतमाल
तालुक्यातील सावर येथील शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुमारास घडली.
प्रकाश देवराव मडावी 55 वर्षे रा बोरगाव भिलुक्ष असे मृतकाचे नाव आहे
मृतक हा सावर जवळील बोरगाव भिलुक्ष येथील रहिवासी असून त्याच्या कडे पाच एकर शेती असून तो जी.प. मैलकुलीचे काम करतो दि.18 सकाळी सावर येथील प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्रा जवळील कचरा कापण्याचे काम मजुरा सोबत करीत होता. मजुराला घरी सोडून परत आल्यावर त्याने तिथे विष प्राशन करून आत्महत्या केली .
5 एकरात त्याने सोयाबीन पेरले होते.सततच्या पावसाने सोयाबीन खराब झाल्याने निराश राहत होता त्यामुळे आत्महत्या केली असावी असे गावात बोलल्या जात आहे. त्यांचा मागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
Updated : 19 Sep 2021 1:36 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire