Home > Crime news > डॉ हनुमंत धर्मकारे हत्याकांडातील, मुख्य आरोपीस अखेर अटक!

डॉ हनुमंत धर्मकारे हत्याकांडातील, मुख्य आरोपीस अखेर अटक!

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून "एेफास" यास केले पोलिसांनी जेरबंद

डॉ हनुमंत धर्मकारे हत्याकांडातील, मुख्य आरोपीस अखेर अटक!
X

डॉ हनुमंत धर्मकारे हत्याकांडातील, मुख्य आरोपीस अखेर अटक!

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून "एेफास" यास केले पोलिसांनी जेरबंद

न्यायालयाने सुनावली दोन्ही आरोपींना दहा दिवसाची पोलिस कोठडी!

राजेश ढोले/ पुसद प्रतिनिधी

उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या घालून हत्या करणारा मुख्य आरोपी अखेर अटक,जिल्हा पोलिस अधीक्षक, डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी पुसद उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुप्रसिद्ध डॉ. हनुमंत धर्माधिकारी यांची, 11 जानेवारी2022 रोजी उमरखेड येथे गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती या घटनेच्या अनुषंगाने जन आक्रोश उसळला होता मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते चार आरोपी सय्यद खालील,सय्यद मुस्ताक, सय्यद खलील शेख मोहसीन, शेख कयूम, शेख शाहरुख, शेख, अक्रम सर्व राहणार ढाणकी तालुका उमरखेड येथील आरोपींना काही दिवसातच अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी हा फरार होता मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक गोपिय, बातमीदार नेमली, आणि संपूर्ण तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य पणाला लावून आरोपींची शोध मोहीम सुरू केली प्राप्त गोपनीय माहितीवरून शेख एेफास, शेख अब्रार,राहणार वसंत नगर पुसद याला मध्य प्रदेशातील जिल्हा धार येथून पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी पुसद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय येथील पत्रकार परिषद दिली आहे दोन आरोपींना अटक करून हल्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून आज पुसद येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे न्यायाधीश व्ही बी कुलकर्णी यांनी दोन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशी माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी आज येथे दिली आहे.

Updated : 5 Feb 2022 7:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top