Home > Crime news > डॉक्टरची हत्या प्रकरण ; हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

डॉक्टरची हत्या प्रकरण ; हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

Doctor's murder case; The assailant reached Dhanki from Umarkhed in 12 minutes

डॉक्टरची हत्या प्रकरण ; हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी
X

डाॅक्टर

डॉक्टरची हत्या प्रकरण ; हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

यवतमाळ : उमरखेड येथील बालरोगतज्ज्ञाची मंगळवारी सायंकाळी भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनेनंतर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून हल्लेखोर हा ढाणकी मार्गाने मराठवाड्यात पळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याने उमरखेड ते ढाकणी हा प्रवास अवघ्या १२ मिनिटात केला. ४.४५ वाजता गोळीबार करून तो ढाणकितील बारमध्ये ५.११ मिनिटांनी आढळून आला.

हाच धागा पकडून त्याच्या शोधात पोलीस पथके रवान झाली आहे. तर तत्काळ आरोपीला अटक करा या मागणीसाठी डॉक्टरच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

डॉ. हनुमंत धर्मकारे हे उपजिल्हा रुग्णालयातून चहा पटरीवर आले. तेथून चहापान घेवून बाहेर पडले असता पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. नंतर हा हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबरसेल, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, न्याय वैज्ञानिक शाळा पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांना पाचारण केले. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे दोन्ही अधिकारी रात्रभर तळठोकून होते."

Updated : 13 Jan 2022 7:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top