Home > Crime news > यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Crimes have been registered against two sanitation workers of Yavatmal nap

यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
X

यवतमाळ- कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, दि. ८ ऑगस्टला सकाळच्या सुमारास यवतमाळ नगरपालिकेत घडली. राजू मोगरे वय ६० वर्ष आणि सुभाष चव्हाण वय ५० वर्ष असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. नगरपालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार नगरपालिकेतील प्रभारी आरोग्य निरीक्षक लता गोंधळे आणि शिपाई आनंद बिसमोरे दोघेही नेहमी सकाळच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असतात. ८ ऑगस्टला सकाळी ते दोघेही नेहमीप्रमाणे सफाई कामगारांनी हजेरी घेत होते. यावेळी सफाई कर्मचारी राजू मोगरे आणि सुभाष चव्हाण या दोघांनी कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांची हजेरी घेवू दिली नाही. तर सफाई कर्मचाऱ्यांना जो पर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत कामावर जायच नाही, असे ते दोघे जोरजोराने बोलून कामगारांना चिथावणी देत होते. दरम्यान प्रभारी आरोग्य निरीक्षक लता गोंधळे यांनी याबाबत मुख्याधिकारी मडावी यांना माहिती देत ते दोघे गोंधळ घालत असल्याचे सांगितले. त्यामूळे तातडीने मुख्याधिकारी मडावी यांनी नगरपालिका गाठली. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील नाल्या मोठ्या प्रमाणात चोकअप झाल्याने अनेकांच्या तक्रारी नगरपालिकेकडे आल्या होत्या. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विषय निर्माण झाला होता. यावेळी सफाई कामगार जाण्यास तयार असतांना राजू मोगरे आणि सुभाष चव्हाण या दोघांनी मुख्याधिकारी मडावी यांना पहिले कामगाराच्या मागण्या मान्य करा, असे म्हणत मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच हातवारे करीत जोरजोराने आरडाओरड करीत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी त्या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

Updated : 9 Aug 2022 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top