Home > Crime news > पोलिस स्टेशन आसेगाव अंर्तगत दाखल गुन्हा क्र. ०१८६ / २२ कलम ३५४, ४५२ भादविचे दोषारोप अवघ्या ०४ तासात दाखल

पोलिस स्टेशन आसेगाव अंर्तगत दाखल गुन्हा क्र. ०१८६ / २२ कलम ३५४, ४५२ भादविचे दोषारोप अवघ्या ०४ तासात दाखल

Case No. filed under Asegaon Police Station. 0186/22 Section 354, 452 Bhadavi charges filed in just 04 hours

पोलिस स्टेशन आसेगाव अंर्तगत दाखल गुन्हा क्र. ०१८६ / २२ कलम ३५४, ४५२ भादविचे दोषारोप अवघ्या ०४ तासात दाखल
X

पोलिस स्टेशन आसेगाव अंर्तगत दाखल गुन्हा क्र. ०१८६ / २२ कलम ३५४, ४५२ भादविचे दोषारोप अवघ्या ०४ तासात दाखल

(फुलचंद भगत)

वाशिम:-पोलिस स्टेशन आसेगाव येथे दिनांक २३/०६/२०२२ रोजी फिर्यादी हिने पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली की, दिनांक २२/०६/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता दरम्यान घरात एकटीच स्वंयपाक करीत असतांना आरोपी नामे धर्मराज इंदल चव्हाण, वय २६ वर्ष, रा खेर्डा, ता मानोरा, जि.वाशिम हा फिर्यादीच्या घरात जावुन फिर्यादीचा वाईट उददेश्याने उजवा हात धरुन आरोपीने फिर्यादीस म्हटले की, 'तु माझ्यासोबत बोल' असे म्हणुन आरोपीने फिर्यादीला लोटुन दिले व फिर्यादीने जोरात ओरडल्यानंतर आरोपी घरातुन पळुन गेला. सदर फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलिस स्टेशन आसेगाव येथे अप क्र. ०१८६/२२ कलम ३५४, ४५२ भांदविप्रमाणे गुन्हा दाखल १२.५७ वाजता पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात येवुन ठाणेदार सपोनि सागर दानडे यांनी सदरचा गुन्हा महीला अत्याचारसंबंधाने असल्याने तात्काळ स्वत:कडे तपासात घेतला.

महीला अत्याचारसंदर्भातील गुन्हयामध्ये मा. पोलिस अधिक्षक बच्चनसिंग साहेब (IPS), वाशिम यांनी वेळोवेळी क्राईम मिटींगमध्ये सदरच्या गुन्हयात तात्काळ कारवाई करुन दोषारोप पत्र दाखल करण्याबाबत व असे गुन्हे करणारे समाज कंटकावर दहशत बसविण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मा. उपविभागिय पोलिस अधिकारी, मंगरुळपिर श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील आरोपी नामे धर्मराज इंदल चव्हाण, वय २६ वर्ष, रा खेर्डा, ता मानोरा, जि वाशिम यास १४.२५ वाजता तात्काळ अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असता त्यांनी आरोपीचा दिनांक ०७/०७/२०२२ पर्यंत एमसीआर मंजुर केला तसेच सदर गुन्हयातील फिर्यादीसह एकुण ०५ साक्षिदार यांचे जाबजबाब नोंद करण्यात येवुन आरोपीविरोधात सबळ साक्ष पुरावे मिळुन आल्याने दोषारोप पत्र क्र. ४६ / २२ नुसार तयार करुन आरोपीविरोधात मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,मानोरा यांच्याकडुन सि.सि. नं १६४ / २२ दिनांक २३/०६/२०२२ रोजी १७.०० दाखल करण्यात आले.सदरची कामगिरी मा. पोलिस अधिक्षक श्री. बच्चनसिंग साहेब (IPS), मा. अपर पोलिस अधिक्षक साहेब श्री. गोरख भामरे (IPS), मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. यशवंत केडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सागर दानडे, सपोउपनि रमेश काबंळे, ब.न. ५०४, पोहवा गणेश भोयर, ब.न. ६४१, नापोशि विजय शिनगारे, ब.न. ७७०, पोलिस शिपाई नामदेव हाके, ब. न. ९६३, रामेश्वर नरुटे, ब.न. १३२६, रवि मालवे, ब.न. १११७, मपोह. तनुजा राकेश ब.न. ९२७ यांनी पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 23 Jun 2022 3:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top