Home > Crime news > मंगरुळपीर येथे भरदिवसा घरफोडी; 12,50,000 रुपयाचे सोन्याचांदीचे ऐवज लंपास

मंगरुळपीर येथे भरदिवसा घरफोडी; 12,50,000 रुपयाचे सोन्याचांदीचे ऐवज लंपास

Burglary in broad daylight at Mangrulpir; 12,50,000 rupees instead of gold and silver lampas

मंगरुळपीर येथे भरदिवसा घरफोडी; 12,50,000 रुपयाचे सोन्याचांदीचे ऐवज लंपास
X

(फुलचंद भगत)

वाशिम:-मंगरुळपीर शहरातील नविन सोनखास येथील शिक्षिकेच्या घरी भरदिवसा घरफोडी झाली असुन अंदाजे 12,50,000 रुपयाचे सोनेचांदी असा ऐवज अज्ञात चोरांनी लंपास केला आहे.घटनेची माहीती मीळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावुन पंचनामा केला आणी पुढील तपास सुरु केला आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार फिर्यादी ज्योती विजय डवले वय 57 वर्ष काम शिक्षक रा. नविन सोनखास टॉवर जवळ मंगरूळपीर जि. वाशिम यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली आहे.की,दिनांक 03/10/2022 रोजी फिर्यादी नेहमी प्रमाणे सकाळी 11.00 वाजता सुमारास त्यांच्या घराला लॉक लावुन नौकरी करीता बालदेव येथे शाळेत गेले. सायंकाळी 05.15 वाजता सुमारास घरी परत आले असता वॉल कम्पाउड चे लोखंडी गेट उघडुन आत गेले तर घराचे दरवाजाचे लॉक तुटलेले दिसुन आले. दारा ची कडी बाहरून अर्धवट लावली दिसली.फिर्यादी दार उघडुन आत गेल्या तर दुस-या रूम मधील लोखंडी आलमारी मधील कपडे अस्ताव्यस्त दिसुन आले. बाजुचे रूम मधील दोन लोखडी आलमारी मधील कपडे सुध्दा अस्ताव्यस्त खाली पडलेले दिसुन आले. घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी लोखंडी आलमारीत लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चेक केले तर मिळुन आले नाही.


ते सोन्याचे दागिने खालील प्रमाणे असल्याने फिर्यादीत नमुद केले आहे.

1 ) माझे जवळील सोन्याची पोत 4 तोळे कीमत अंदाजे 2 लाख रू

2 ) पोहे हार सोन्याचा 4 तोळे कीमंत अंदाजे 2 लाख रू

3 ) पाटल्या सोन्याचा 4 तोळे कीमंत अंदाजे 2 लाख रू

4 ) अंगठी सोन्याची 5 ग्रॅम कीमंत अंदाजे 25 हजार रू

5) अंगठी सोन्याची 5 ग्रॅम कीमंत अंदाजे 25 हजार रू

6 ) चेन सोन्याची 1 तोळे कीमंत अंदाजे 50 हजार रू

तसेच माझे मुलगी नामे प्रिती हीचे सोन्याचे दागिने खालील प्रमाणे.

1 ) मंगलसुत्र सोन्याचे 4 तोळे कीमत अंदाजे 2 लाख रू

2 ) बांगळया सोन्याचे 6 तोळे कीमत अंदाजे 3 लाख रू

3) तिन नथ सोन्याचे 5 ग्रॅम कीमत अंदाजे 25 हजार रू

4 ) चांदीचा गडवा अर्धा कीलो 25,000रू अशा एकुण 12,50,000 रू मुददेमाल दि. 03/10/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ते 05.15 वाजता दरम्यान अज्ञात चोराने घराचें दरवाजाचे लॉक तोडुन आत प्रवेश करून चोरी केली आहे.अशी तक्रार मंगरुळपीर पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.सदर घटनेची माहीती मीळताच पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आणी पुढील तपास वाशिमचे पोलीस अधीक्षक तसेच ऊपविभागिय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात तर ठाणेदार श्री.सुनिल हूड यांच्या नेतृत्वात पोलीसांनी सुरु केला आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 6 Oct 2022 8:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top