Home > Crime news > सिंघु सीमेवर एकाची निर्घृण हत्या; निहंग शीखांवर आरोप

सिंघु सीमेवर एकाची निर्घृण हत्या; निहंग शीखांवर आरोप

Brutal murder of one at Singhu border; Allegations against Nihang Sikhs

सिंघु सीमेवर एकाची निर्घृण हत्या; निहंग शीखांवर आरोप
X

नवी दिल्लीः दिल्ली-हरियाणा सीमेवर (सिंघु बॉर्डर) शेतकर्यांच्या आंदोलन ठिकाणी एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्यक्तीचे नाव लखबीर सिंह असून तो पंजाबमधील तरण तारण जिल्ह्यातील चीमा खुर्द या गावातील मजूर आहे. लखबीर सिंह याचे उजवे मनगट व डावा पाय मोडल्याचे दिसून आले आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओत लखबीर सिंह याच्या मृतदेहाजवळ हातात तलवारी घेतलेले काही निहंग शीख दिसत असून मृत लखबीर सिंह याने शीख धर्माच्या पवित्र ग्रंथाचा अवमान केल्यामुळे त्याला ठार मारण्यात आल्याचे काही निहंग शीखांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही अज्ञातांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात एका निहंगाने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

या घटनेप्रकरणात ज्येष्ठ शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी निहंग शीख समुहांचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मृत लखबीर सिंह काही काळ निहंग शीखांसोबत राहात होता असा दावा त्यांनी केला. पण झाल्या प्रकरणातील दोषींना कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात व्हीडिओमध्ये एका व्यक्तीला पोलिस बॅरिकेडला बांधले गेले असून त्याचे उजवे मनगट, डावा पाय व गुडघे मोडले आहेत.

मृत लखबीर सिंह याला शनिवारी पहाटे तीन वाजता आंदोलनास्थळी गुरुद्वारा साहिब जवळ पाहिल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. लखबीर सिंह शीखांचा पवित्र ग्रंथ उचलण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी उपस्थित काहींनी तो कोण आहे व त्याला येथे कुणी पाठवलेय अशी विचारणा केली. यावेळी वादविवाद होऊन लखबीरचे पाय व हात मोडले. त्याला बॅरिकेडला बांधले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

लखबीर आपल्यी बहीणसोबत राहात होता, त्याचे वडील माजी सैनिक होते, खुद्ध लखबीर हा मजूर म्हणून काम करत होता.

Updated : 15 Oct 2021 8:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top