Home > Crime news > ब्रेकिंग न्यूज.....गुंजच्या मारोती जवळ ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू..

ब्रेकिंग न्यूज.....गुंजच्या मारोती जवळ ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू..

Breaking News ..... Young man killed in truck accident near Gunj's Maroti ..

ब्रेकिंग न्यूज.....गुंजच्या मारोती जवळ ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू..
Xनिलेश अ. चौधरी (विभागीय संपादक)

वणी-वरोरा मार्गावरील गुंजच्या मारोती जवळ मध्ये रात्री झालेल्या ट्रक अपघातात वणीतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सुरज अमर मेळपे (ठाकुर) (३०)रा.सर्योदय चौक जवळ वणी असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शुक्रवार दि.३ मार्च रोजी रात्री १२ ते १२:३० वाजताच्या सुमारास सुरज व ट्रक चालक हे वरोरा कडुन वणी कडे ट्रक घेऊन येत असतांना गुंजच्या मारोती जवळ ट्रक पलटी झाला, या अपघातात सुरज गंभीर जखमी झाला होता तर त्याचा मित्र ट्रक चालक हा किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या सुरजला उपचारासाठी म्हणुन चंद्रपूर ला नेत असतांना त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसाआधी लग्न झालेल्या सुरज च्या मृतमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Updated : 4 March 2022 4:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top