भांदवी गुन्ह्यातील आरोपीस अटक.
Bhandavi accused arrested.
X
दि. 19.09.2021 रोजी फिर्यादी नामे अनिकेत बाळासाहेब कोहल्ले वय 28 वर्ष रा. पाथरी याचे फिर्यादीवरुन पो.स्टे अल्लीपुर अप क्रमांक 337 / 21 कलम 392, 506 भांदवी अन्वये दाखल झाला सदर गुन्ह्यातील आरोपी नामे दिपक साहेबराव गावंडे वय 33 वर्ष रा. दिघी (बोपापुर) ता. देवळी, जि. वर्धा यास पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल भोजगुडे व पो. स्टाफ यांनी दिली ( बोपापुर) येथील आरोपीचे राहते घरातुन ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरीस गेलेली मालमत्ता एक रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 8000 /- रुपये, 1000 / रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन मारुती सुझुकी SX4 क्रमांक MH32C4345 किंमत 2,50,000 असा एकुन 2,59,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपीस अटक करण्यात आली. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर सा., अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके सा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंह पाटील सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुनिल गाडे पो.स्टे. अल्लीपुर यांचे पोलीस पथक पोउपनि स्वप्रिल भोजगुडे, पोउपनि रमेशकुमार मिश्रा, चापोहवा शंकर पोहाने ब.न. 1175, नापोशि अभय वानखेडे ब.न. 1269, पो.शि. सुशिल सायरे ब.न. 1570, पो.शि. महेंद्र गायकवाड बन 370, पो.शि. निलेश नुगुरवार ब.न. 1729, पो. शि. तुषार भोंबे ब.न. 1670 यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनिल गाठे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्रिल भोजगुडे हे करीत आहेत..