मारहाण प्रकरणी बापलेकास दंडाची शिक्षा
Baplekas sentenced to death in assault case
सचिन काकडे / प्रतिनिधि मारेगाव
मारहाण प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव श्री.एन.पी. वासाडे यांनी आरोपी नामे अनिल देवराव आस्वले व देवराव शामराव आस्वले रा.कोलगाव ता.मारेगाव जि यवतमाळ या बापलेकास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दी. ०२/०९/२०२१ रोजी सुनावली आहे
सविस्तर व्रूत्त असे की मारेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी हा दि. दि.१७.०७.१६ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास आपले मित्रांना घेवुन कान्हाळगाव शिवारातील शेतात गेला होता परत येत असताना कोलगाव येथील वांडरे यांचे शेताजवळ आले असता मागुन आरोपी नामे अनिल हा त्याचे फँशन प्रो मोटारसायकल ने फिर्यादीचे मोटारसायकल ला ठोस मारली ठोस का मारले म्हणून विचारले असता अनिलने त्याची मोटारसायकल समोर लावुन फिर्यादिला तु काय करतो असे म्हणत अश्लील शीवीगाळ करीत फिर्यादिला व त्याचे मित्रांना थापड बुक्याने मारहाण केली.व आरोपी अनिलने त्याचे वडिलांना फोन करून बोलावले त्याचे वडील देवराव हा तुतारीची काठी घेवुन आलाव अश्लील शीवीगाळ करीत फिर्यादिला व त्याचे मित्रांना मारहाण केली व एकेकाला जीवाने मारुन टाकतो अशी धमकी दिली मारहाणीत फिर्यादिला व मित्रांना डावे हाताला, पाठीवर,डावे पायाला मुका मार लागला वरुन फिर्यादीने पोलीस स्टेशन मारेगाव ला जावुन रिपोर्ट दिला पोलीसांनी आरोपी विरूद्ध भा.द वि. चे कलम ३२४,२७९,२९४,५०६ ,
भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंद केला सदर गुन्हाचा नापोका निलेश वाढई ब.न.१८३५ यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी,डाँक्टर व तपास अधिकारी यांचे सह सात साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील श्री पी डी कपुर व पोलीस स्टेशन मारेगावचे ठाणेदार श्री मंडलवार यांचे मार्गदर्शनात कोर्ट पैरवी श्री ढुमणे यांनी काम पाहीले.