बोथा घाटात अपघात दुचाकीस्वार बँक कर्मचारी ठार.
Bank employee killed in Botha Ghat accident
ashish sunatkar | 12 July 2021 11:35 AM GMT
X
X
बुलडाणा: अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल 11 जुलैला रात्री आठच्या सुमारास दुःखातील सरपंच ढाब्याजवळ घडली संदीप पंजाबराव देशमुख वय 40 राहणार देऊळघाट हल्ली मुक्काम अकोला असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
संदीप देशमुख हे अकोला येथे सेंट्रल बँकेत कॅशियर होते. बुलढाणा येथे बँकेतील काही सहकाऱ्यांना निरोप समारंभासाठी पार्टी देण्यासाठी ते आले होते. काल अकोला येथे दुचाकीने परत जाताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. संदीप देशमुख यांना पत्नी 8 वर्षाचा मुलगा 6 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
Updated : 12 July 2021 11:35 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire