Home > Crime news > राजन्ना अपार्टमेंन्टमध्ये सुरु असलेल्या जुगारावर अवधुतवाडी पोलीसांनी टाकली धाड

राजन्ना अपार्टमेंन्टमध्ये सुरु असलेल्या जुगारावर अवधुतवाडी पोलीसांनी टाकली धाड

Avadhutwadi police raided a gambling den in Rajanna's apartment

राजन्ना अपार्टमेंन्टमध्ये सुरु असलेल्या जुगारावर अवधुतवाडी पोलीसांनी टाकली धाड
X

यवतमाळ -: जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहीतीवरून काल रात्री यवतमाळ शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जाजू चौकातील राजना अपार्टमेंट मध्ये पोलीसांनी धाड घालून १३ आरोपीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जाजु अपार्टमेंट येथील निलेश | पिपरानी यांच्या चौथ्या मजल्यावर प्लॅट क्रमांक ४०१ मध्ये जुगार सुरू असल्याची माहीती गुन्हे शाखेला प्राप्त झाली त्यावरून गुन्हे शाखेने रात्री जाजु चौकातील राजत्रा अपार्टमेंट मध्ये चाड टाकली असता आरोपी निलेश महेंद्र पिपरानी (४३) रा. राजन्ना अपार्टमेंट,मनिष रामविलास मालानी (४४) रा. बोरी अरब, सौरव शिवम मोर (४१) रा. मेन लाईन यवतमाळ विपुल पद्माकर खोब्रागडे (१९) रा. पाटीपुरा,राहुल सुरेंद्र शुक्ला (४०) माईन्दे चौक यवतमाळ, नवलनारायण बजाज उर्फ अग्रवाल (५५) रा. चांदोरे नगर, प्रेमरतन ताराचंद राठी (४४) रा. गांधी नगर यवतमाळ,रूपेश आनंदराव कडु (४२) रा.धामनगाव रोड, सुनील हरीरामजी अग्रवाल (५३) रा.गुरुदेव नगर, लक्ष्मिकांत चंम्पालालजी गांधी (५८)रा.राजन्ना अपार्टमेंट,अनिल भवरीलालजी मानधना (५४) रा. श्रोत्री हॉस्पीटल जवळ, कमलेश अमृतलाल गंडेचा (४८) रा. माईन्दे चौक, अशोक ओंकारमल भंडारी (६०) रा. सारस्वत चौक या १३३ आरोपी कडुन जुगारात सुरू असलेल्या डावामधुन ५ ख ५७ हजार रुपये रोख १६ मोबाईल किंमत १ लाख ९४ हजार रूपये दुचाकी वाहने ४ लाख रुपये असा एकुन ११ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Updated : 8 Sep 2021 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top