Home > Crime news > दोन मुलीच झाल्याने कोयत्याने हल्ला करून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न ; उमरखेड तालुक्यातील पार्डी बंगला येथील घटना

दोन मुलीच झाल्याने कोयत्याने हल्ला करून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न ; उमरखेड तालुक्यातील पार्डी बंगला येथील घटना

Attempting to kill his wife by attacking Koyta with two daughters; Incident at Pardi Bungalow in Umarkhed Taluka

दोन मुलीच झाल्याने कोयत्याने हल्ला करून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न ; उमरखेड तालुक्यातील पार्डी बंगला येथील घटना
X

Yavatmal : breaking


यवतमाळ : दोन मुली झाल्याच्या कारणातून पती नेहमीच पत्नीला वाद घालत मारहाण करायचा. दरम्यान अश्याच वादातून पतीने पत्नीसोबत वाद करुन नायलॅान दोरीने गळा आवळुन जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. याला पत्नीने विरोध केला असता चिडून पतीने पत्नीवर लोखंडी कोयत्याने डोक्यावर, मानेवर वार करून गंभीर जखमी केले. ही खळबळजनक घटना उमरखेड तालुक्यातील पार्डी बंगला येथे घडली. या घटनेनंतर आरोपीने पोफाळी पोलीस स्टेशन गाठून हे कृत्य केल्याची कबुली दिली दिली. जयश्री शिवाजी चव्हाण अस गंभीर जखमी पत्नीचे नाव असून शिवाजी अवधुत चव्हाण (वय३८ वर्ष) पार्डी बंगला असे आरोपी पतीचे नाव आहे. शिवाजी चव्हाण याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची माहिती दिल्यावरुन ठाणेदार राजीव हाके, प्रकाश बोंबले यांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध कलम ३०७ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली.

Updated : 25 Aug 2022 6:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top