Home > Crime news > दुकान फोडण्याचा प्रयत्न असफल चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .

दुकान फोडण्याचा प्रयत्न असफल चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .

Attempted burglary unsuccessful thief captured on CCTV camera.

दुकान फोडण्याचा प्रयत्न असफल चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .
Xतालुका प्रतिनिधी

महागांव/ यवतमाळ : कॉम्प्लेक्सच्या गॅलरीत झोपलेल्या इसमाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना महागाव तालुक्यातील मुडाणा येथे आज (ता.२३)रात्री पावणे तीनच्या सुमारास उघडकीस आली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मुडाणा येथे गौळ रोडवर असलेल्या पांडे कॉम्प्लेक्समध्ये द्वारका किराणा ,खुशी बुट हाऊस, भावेश कलेक्शन ही दुकाने आहेत मध्यरात्री नेहमीप्रमाणे कॉम्प्लेस गॅलरीत झोपलेल्या अरविंद भिमटे या इसमाला शटरचा आवाज आल्याने तो खडबडून जागी झाला त्याने अंगावरील ब्लॅंकेट काढून पहिले असता त्याला अज्ञात चोरटे हातात धारदार शस्त्र घेऊन दुकान फोडत असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे तिथून पळ काढला त्यातील तिघांनी धारदार शस्त्र घेऊन पाठलाग केला मात्र तोपर्यंत तो अरविंद भिमटे यांनी गावातील काही नागरिकांना घटनेची माहिती दिल्याने आरडाओरड झाली तोपर्यंत चोरटे तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले अज्ञात चोरटे यांची संख्या चार असल्याने सांगण्यात येत आहे घटनेची फिर्याद महागाव पोलिस स्टेशनला देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

Updated : 24 Sep 2021 3:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top