गुरुनानक नगरातील बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघींविरुध्द पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
Attempted abduction of a girl in Gurunanak town; A case has been registered against them at the police station
X
गुरुनानक नगरातील बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघींविरुध्द पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
यवतमाळ-: शहरातील जामनकर नगर परिसरामध्ये राहत असलेल्या नम्रता जगदीश मिश्रा ऊर्फ गुड्डी ही जामनकर नगर मधली हसीना पारकर म्हणून सध्या चर्चेत असून तिच्या शिरावर अनेक गुन्हे नोंदविले गेले आहे. यापूर्वी तिने महिलेचा खून,अनेकांना धमकावणे,अवैध सावकारी, मारहाण करणे, नुकताच तिच्यावर एका बालिकेच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून यामुळे परिसरामध्ये तिची दहशत निर्माण झाली आहे.
ही गंभीर घटना येथील भोसा मार्गावरील पेट्रोलपंपापुढे ३१ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर त्या चिमुकलीच्या आईने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून दोन तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोही अविनाश चौधरी रा. गुरुनानकनगर असे अपहरणाचा प्रयत्न झालेल्या ११ महिन्यांच्या चिमुकलीचे नाव आहे.तिचे वडील अविनाश चौधरी (२९) रा. गुरुनानकनगर यांना नम्रता उर्फ गुड्डी जगदीश मिश्रा (३०) आणि तिची मैत्रिण छकुली (१९) दोघीही रा.जामनकरनगर यांनी कुणकुण लागताच चिमुकली स्वाधीन राहत्या घरून दुचाकीवर बसवून नेले. सायंकाळ झाली तरी ते परत न आल्याने आरोहीची आई रेश्मा अविनाश चौधरी (२९) ही चिंतेत होती. दरम्यान, तिचा पती अविनाश हा गुड्डी मिश्राबरोबर येथील भोसा मार्गावरील पेट्रोलपंपापुढे असल्याची माहिती रेश्माला मिळाली. त्यामुळे ती पती अविनाशला घेण्यासाठी आरोहीला सोबत घेऊन गेली. यावेळी गुड्डी मिश्राने तिच्याशी पतीला नेण्यावरून वाद घातला.एवढेच नव्हेतर मारहाण करून चिमुकल्या आरोहीला हिसकावत छकुलीच्या स्वाधीन केले. शिवाय, पती आणि चिमुकलीला सोडणार नसल्याचा सज्जड दमही भरला. त्यावर रेश्माने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. तसेच याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून गुड्डी मिश्रा आणि छकुली या दोघींविरुद्ध भादंवि ३६३, ३२४, २९४ कलमान्वये अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चिमुकल्या आरोहीला गुड्डी आणि छकुलीने ताब्यात घेतल्यानंतर रेश्माने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. तसेच रीतसर तक्रारही दिली. याची कुणकुण गुड्डी आणि छकुलीला लागताच दोघीही आरोहीला सोबत घेऊन अवधूतवाडी पोलीस ठाण्यापुढे पोहोचल्या. त्यानंतर रेश्माला बाहेर बोलावून त्यांनी चिमुकल्या आरोहीला आई रेश्माच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली.