Home > Crime news > महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न.

महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न.

Attempt to kill the woman.

महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न.
X
पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक 16. 9. 21 रोजी सायंकाळी 17.30 वा चे दरम्यान फिर्यादी महिला नामे रंजना मारोतराव मरसकोल्हे वय 37 वर्षे हिने आरोपी रितिक नितिन रघाटाटे वय 21 याचेकडून 75000/- रु उसने घेतले होते ते त्याने परत मागितले असता तिने मजुरीचे काम करून देईन असे म्हटले असता आरोपीने तिला अश्लील शिविगाळ केली व चर्चा करण्यासाठी तिला त्याचे घरी बोलावले.फिर्यादी ही आरोपीचे घरी गेली असता 17.45 ते 18.00वा.चे दरम्यान आरोपीने तिला घरात आल्या आल्या 2-3 थापड मारल्या त्यावेळी घरात हजर असलेले आरोपीचे आईवडील मध्ये गेले असता त्यांना सुद्धा आरोपीने धक्का बुक्की करत घराबाहेर काढले व दरवाजा आतून बंद करून घेऊन फिर्यादीला स्वतः जवळील कटरने मानेच्या डाव्या बाजूवर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व स्वतः दरवाजा उघडून घराबाहेर येऊन पळून गेला रक्तबंबाळ अवस्थेतील फिर्यादी हिला प्रथम हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून तिला सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये रेफर केले गेले घटनास्थळी भेट देऊन आरोपीला शोधून ताब्यात घेतले असून यातील फिर्यादी हिचे DD बयान सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतल्यानंतर आज सकाळी 5.35 वा अप क्र 841/21 कलम 307,342,294,323 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे जखमींची प्रकृती स्थिर आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे करीत आहे.

Updated : 18 Sep 2021 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top