Home > Crime news > घरात घुसून दोघांवर प्राणघातक हल्ला

घरात घुसून दोघांवर प्राणघातक हल्ला

केळापूर येथील घटना, दोघेही गंभीर जखमी

घरात घुसून दोघांवर प्राणघातक हल्ला
X

पांढरकवडा - केळापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन अज्ञात आरोपींनी घरात घुसून दोन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एक 30 वर्षीय महिला व तिचा 17 वर्षीय पुतण्या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रंजना उमेश गोहणे (30) आपल्या 11 वर्षीय मुलगी रुद्राणी व बहिणीचा 17 वर्षीय मुलागा अनिकेत संजय वैध ला घेऊन केळापूर येथे वास्तव्यास आहे. त्याच घरात खालच्या मजल्यावर तिचे भासरे गणेश गोहणे आपल्या पत्नी व आई सोबत वास्तव्य करतात. शुक्रवार दिनांक 14 ला रात्री 2.30 च्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व हातात असलेल्या धारदार चाकूने रंजना वर हल्ला चढविला. घरात होत असलेल्या आवाजाने रंजनाचा पुतण्या अनिकेत जागी झाला व तिला वाचविण्यासाठी मध्ये आले असता अज्ञात आरोपींनी त्याच्यावर सुद्धा चाकूने हल्ला चढविला. दरम्यान धारदार चाकूने केलेल्या हल्लेत रंजना व अनिकेत दोघेही रक्तबंबाळ झाले व खाली पडले असता हे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. सोबतच आरोपीने रंजनाचा रेडमी कंपनीचा मोबाईल सुद्धा सोबत नेला व बाहेरून दरवाजा बंद केला. दरम्यान घरात बंद तिघांनी ही आरडा - ओरड करून शेजाऱ्यांना बोलाविले असता त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर गावातील अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले. रंजनाचे भासरे विलास गोहणे यांनी गावातीलच एका वाहनाने पांढरकवडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले. पांढरकवडा पोलिसांनी रंजना गोहणेच्या फिर्यादीवरून कलम 307, 450, 34 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटील, पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा पोलिस करीत आहे.

Updated : 15 Oct 2022 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top