Home > Crime news > हिंगणघाट येथे तरुणावर प्राणघातक हल्ला

हिंगणघाट येथे तरुणावर प्राणघातक हल्ला

Assassination of a youth at Hinganghat

हिंगणघाट येथे तरुणावर प्राणघातक हल्ला
X
हिंगणघाट. दि .७/ शहरातील चोखोबा वॉर्ड भागात राहणाऱ्या रमजान खान इसराइल खान (३८) याचेवर कारण नसताना डीगो याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

जखमी रमजान हे मंगळवारी रात्री पानटपरीवरून घरी जात होते. वाटेत गुंजूबाई हिने रमजान यांना आवाज दिला. रमजान तेथे थांबला. तहान लागल्यामुळे गुंजूबाई यांच्याकडे पाण्याची मागणी केली. पाणी पित असताना मागाहून डिंगो आला. कारण नसताना जवळ असलेल्या कातीने रमजानच्या डाव्या गालावर

सावरीत डिंगोला पकडले. त्यावेळी डिंगोने रमजानच्या डाव्या हाताला व बोटाला जोरदार चावा घेतला. लगेच डिंगो याने पुन्हा काती घेऊन रमजान याचे छातीवर वार करीत घटनास्थळावरून पळ काढला. कोणतेही कारण नसताना हा प्राणघातक हल्ला करण्यात आला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जखमी रमजानच्या तक्रारीवरून संतोष उर्फ डिंगो याचेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना हिंगणघाट शहरातील चोखोबा वॉर्ड पाणी टाकी जवळ रात्र दिवस जुवा सुरू रहाते . तेथे दारू व गांजा विकण्याचा धंदा सुरू आहे. त्या भागातील लोकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सामना करावा लागत आहे. या अगोदर अनेक घटना घडली. पोलीसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. घटनास्थळावरून पळालेल्या आरोपीचा शोध हिंगणघाट पोलीस करीत आहे.

Updated : 7 April 2022 11:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top