Home > Crime news > वरातीत तलवार घेवून नाचणा-यास अटक

वरातीत तलवार घेवून नाचणा-यास अटक

Arrested for dancing with sword in Varati

वरातीत तलवार घेवून नाचणा-यास अटक
X

वरातीत तलवार घेवून नाचणा-यास अटक

यवतमाळ- लग्नाच्या वरातील तलवार घेवून नाचणे एका अल्पवयीन मुलाला महागात पडले असून तो व्हिडीओ व्हायरल होताच त्या मुलाला अवधुतवाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर शनिवारी कारवाई केली. ही घटना दि. ९ मे रोजी शहरातील चापनवाडी परिसरात रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील साई मंदिर परिसरातील शर्मा यांच्या घरी मुलाचा विवाह होता. त्यानिमित्त शनिवारी लग्नाची वरात काढण्यात आली. या वरातील विधिवत देवीची शस्त्र पुजा करण्यासाठी जात असतांना ते नवरदेवाच्या हातातील शस्त्र घेवून एका अल्पवयीन मुलाने चापनवाडी परिसरातील तिवारी यांच्या घराजवळ डान्स केला. या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. दरम्यान त्या मुलाची शोधमोहीम अवधुतवाडी पोलिसांनी सुरू करीत त्या शनिवारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून ते शस्त्र ताब्यात घेण्यात आले आहे.

Updated : 15 May 2022 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top