मृतकाची पत्नी रुबीना परविन शेख यांची पोलीस अधिक्षककडे मदतीची हाक
माझ्या पतीच्या खुनातील आरोंपीना अटक करा !
मृतकाची पत्नी रुबीना परविन शेख यांची पोलीस अधिक्षककडे मदतीची हाक
यवतमाळ दि.१६ जानेवारी -:तालुक्याचे ग्रामदैवत तपस्वी संत घंटीबाबा यांच्या जत्रा महोत्सवात क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.यात एक गंभीर तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले.यामध्ये शेख मन्नान शेख मजीद याची निर्घुन हत्या करण्यात आली असुन यातील आरोपी आज हि मोकाट फिरत असल्याने मृतकाची पत्नी रुबीना परविन शेख यांनी आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले.
दिग्रस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक रामु पहेलवान यांचे घराजवळ आले तेव्हा तिथे भांडण चालू होते त्यावेळी आहे हे पाहत असताना अचानक पाठीमागून दहा ते पंधरा लोकांचा घोळका आला व मारहाण करू लागला त्यावेळी राज दिलीप कलोशे,निहाल किलोशे,विक्की कलोशे,रोहन सरसिया,ध्रुव सरसिया,निहास सरसिया,राज सरसिया बाॅबी सोनवान,राहुल सोनवाल,शक्ती सोनवाल तसेच सोहन उर्फ सोनू,अर्णव सारसिया, भोला आणि तीन महिला इत्यादींनी त्याचे हातात तलवार कोयता लोखडी रॉडवून दिसले तेव्हा राजू क्लोशे पाने त्याचे हातातातील सवारीने फिर्यादी सलमान खान सलीम खान डोक्यात आणि उजव्या हाताच्या बोटावर तलवारीचा घाव मारल्याने माझे डोल्यातून रक्त निघाल्याने सलमान खान गंभीर झाला.
तेवढ्यात मोहम्मद आबिद मोहम्मद अफजन बाला निहाल कल याने त्याचे हातातील लोखडी रॉडने माझे उजव्या पायाच्या मांडीवर मारूत जखमी केले तसेच दानिश बैग कामिल येग याला विडी लोशे याने त्याचे हातातील तलवारीने डोक्यावर मारून जखमी केले.तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या रुबीना परविन शेख यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या गळ्यातील सेवन पीस व त्यामधील सोन्याचे मनी असे सहा ग्रॅम व गळ्यातील सोन्याच्या मन्यातील अडीच ग्रॅम ची पीत असे एकून साडे आठ ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची किंमत ४०,८०० रु. भोला सोनवाल याने हिसकावून घेतले.
याप्रकरणी आरोपी दि. ०९/११/२०२१ रोजी पो.स्टे. दिग्रस येथे आरोपी विरुद्ध रिपोर्ट दिला आहे त्यावरून आरोपीविरुद्ध अपराध क्र.१२८०/२०२१ नोंदवून मां.द.वि.चे कलम ३०२,३०७ व सहकलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, परंतु प्रकरण गंभीर स्वरूपाचे असतांना आरोपी हे मोकाट फिरत असून त्यांच्या पासून सलमान खान सलीम खान आणि मयत शेख मन्ना यांची पत्नी रुबीना परविन शेख आणि नातेवाईकांच्या जीवाला धोका असून घटनेतील साक्षीदारांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे करिता आरोपींना अटक करावी यासाठी मृतकांची पत्नी रुबीना परवीन शेख यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
We use cookies for analytics, advertising and to improve our site. You agree to our use of cookies by continuing to use our site. To know more, see our Cookie Policy and Cookie Settings.Ok