Home > Crime news > संपत्तीसाठी मारहाण करणा-या मुलांना अटक करा

संपत्तीसाठी मारहाण करणा-या मुलांना अटक करा

पित्याची पोलिसांकडे मागणी

संपत्तीसाठी मारहाण करणा-या मुलांना अटक करा
X

प्रतिनिधी यवतमाळ

संपत्तीसाठी मुले सतत मारहाण करीत असल्याने पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले आहे. मात्र अजुनही आरोपी मुलांना अटक न केल्यामुळे आपला जीव धोक्यात आहे. त्यामुळे संपत्तीसाठी मारहाण करणा-या आपल्या मुलांना अटक करण्याची मागणी पित्याने अवधूतवाडी पोलिसांकडे केली आहे.

फिर्यादी तमिज मिया अमिर मिया देशमुख वय 72 वर्ष जात मुस्लीम व्यवसाय सेवानिवृत्त हे आपल्या मुलांसह लहान वडगाव यवतमाल येथे वास्तव्यास आहे. दरम्यान त्यांची मुले आसिफ देशमुख वय 46 वर्ष तसेच आरीफ देशमुख वय 42 वर्ष मुलाची पत्नी रेशमा आरिफ देशमुख वय 33 तसेच पायल आसिफ देशमुख वय 40 वर्ष हे सर्व जन संपत्तीसाठी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार वडगाव रोड येथे करण्यात आली आहे. दिनांक 04 ऑगष्ट रोजी रात्री 9 वाजताचे दरम्यान मुलांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत तमिज मिया अमिर मिया देशमुख यांनी त्यांचा नातु अफरोज सलीम देशमुख याच्या सोबत अवधूत वाडी पोलिस स्टेशन ला जाऊन जबानी रिपोर्ट दिला. मी नमुद पत्यावर कुटुंबासह राहतो व मी आरोग्य विभाग यवतमाळ येथून सेवानिवृत्त आहे. मला चार मुले व एक मुलगी असुन मुलगा साजीद हा मृत्यु पावला आहे. माझा मुलगा नामे आरीफ देशमुख वय 42 वर्ष आसिफ देशमुख वय 46 वर्ष हे त्याच्या मुला व पत्नीसह ग्राउन्ड फ्लोउर मध्ये राहतात व वरील माळ्यावर माझे सोबत सलिम देशमुख व त्याची पत्नी हिना देशमुख माझे तिन नातु सह राहतो. माझा मुलगा आसिफ देशमुख व आरिफ देशमुख हे दोघे घराचा हिस्याच्या कारणावरुन माझ्याशी नेहमी वाद करुन भांडण करतात. दिनांक 4 ऑगष्ट रोजी रात्री 9 वाजता दरम्यान मी घरी असतांना आसिफ तमिज देशमुख वय 46 वर्ष व आरिफ तमिज देशमुख वय 42 वर्ष या दोघांनी माझ्या सोबत वाद करुन घर आमच्या नावे कधी करून देतो व तुमचे पेंशनचे पैसे आम्हाला का देत नाही या कारणावरुन मला शिवीगाळ केली. तुम्ही अफरोज सलिम देशमुख यांचे नावे घर का केले, वरुन दोन्ही मुलांनी मला मारहान केली व त्याची पत्नी माझी सुन नामे रेशमा आरिफ देशमुख वय 33 वर्ष पायल आसिफ देशमुख वय 40 वर्ष या दोघींनी सुद्धा शिवीगाळ करुन रेशमा आरिफ देशमुख हिने काठिने हाताला पाठिला मारहान केली. माझे दोन्ही मुले व त्यांच्या पत्नीने जिवाने मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दाखल केली आहे. मारहान केल्यामुळे माझ्या छातीवर, डाव्या साईडला डोक्यावर, पोटावर, डाव्या मांडीवर मारल्याने जखमी झालो असे म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांनी त्यांचे वैदयकीय महाविदयालयात जाऊन मेडीकल केले असून अप क्र. व कलम 324,504, 506, 427, 34 भादंवि प्रमाने गुन्हे दाखल केले आहे. विशेष म्हणजे याआधी सुध्दा मारहाण केल्यामुळे पोलिसांनी याच आरोपींवर भादंवि कलम 323, 504, 506, 34 नुसार गुन्हे दाखल केले आहे. या आरोपींना अजुनही पोलिसांनी अटक न केल्यामुळे त्यांचे धाडस वाढले असून पुन्हा मारहाण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी तमिज मिया अमिर मिया देशमुख यांनी केली आहे.

गाडीची चौकशी करावी

आरोपी आसीफ देशमुख याचेजवळ एक बोलेरो गाडी असून यावर भारत सरकार लिहीले आहे. एवढेच नव्हे तर गाडीवर क्राईम इन्व्हेंस्टीगेशन एजन्सी झोनल ऑफीसर महाराष्ट्र राज्य असे लिहीले आहे. अशा खासगी गाडीवर भारत सरकार लिहीले असल्यामुळे पोलिसांनी या गाडीचा दुरुपयोग तर होत नाही याची चौकशी करावी. याव्यतिरीक्त त्यांच्या जवळ असलेल्या अॅटोच्या कागदपत्रात सुध्दा घोळ असल्यामुळे हे कागदपत्र सुध्दा तपासावे अशी मागणी तमिज मिया अमिर मिया देशमुख तसेच अफरोज देशमुख यांनी केली आहे.


हीच ती भारत सरकार लिहीलेली गाडीUpdated : 21 Aug 2022 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top