Home > Crime news > चोरी गेलेली मोटर सायकलचा आर्णी पोलिसांनि लावला शोध

चोरी गेलेली मोटर सायकलचा आर्णी पोलिसांनि लावला शोध

Arni police search for stolen motorcycle

चोरी गेलेली मोटर सायकलचा आर्णी पोलिसांनि लावला शोध
X


पो.स्टे. आर्णी येथे दि.०८/०४/२०२२ रोजी शंकर प्रकाश राठोड रा.फुलवाडी याची मो.सा.क. एम. एच.३७ के.१४९४ हि माहुर चौक आण येथुन कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेली असा रिपोर्ट दिल्यावरुन पो.स्टे. आर्णी येथे अप क.३१०/२०२२ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हयाचे तपसात मा.पोलीस निरिक्षक श्री पितांबर जाधव यांचे मार्गदर्शनात स.फौ १९०४ व्यंकटेश मच्छेवार व पो. शि. २०६९ अभय मिश्रा यांनी तंत्र शुध्द पध्दतीने तपास कामगीरी करीत सदर गुन्हयातील चोरी गेलेली मोटर सायकल विकत घेणारा ईसम नामे रमेश रामजी बुक्ते वय २५ वर्ष राधावा (बु) पो.स्टे. ईचोरा ता. बोथ जि.अदिलाबाद (तेलंगना ) यास तेलंगना राज्यातील ईचोरा, अदिलाबाद येथे जाउन मोठया शिताफिने सदर चोरीची मोटार सायकल खरेदी करणा-या ईसमास पकडुन ताब्यात घेतले व त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेली मोटर सायकल क.एम.एच.३७ के १४९४ हि हस्तगत केली तसेच सदर ईसमास विचारपुस केली असता त्याने सदर ची मोटर सायकल हि नामे सुनिल रामचंद्र मसे रा.सावरी ता किनवट जि.नांदेड याने आर्णी येथुन चोरुन आणल्याचे सांगीतल्याने सुनिल रामचंद्र मसे यास कलम ३७९ भादवि प्रमाणे आरोपी निष्पन्न करुन आरोपीत ईसम रमेश रामजी बुक्ते यास विरुध्द कलम ४११ भादवि अन्वये आरोपी निष्पन्न करण्यात आले आहे सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस निरिक्षक श्री पितांबर जाधव यांचे मार्गदर्शनात सफौ १९०४ व्यंकटेश मच्छेवार, पो.शि. २०६९ अभय मिश्रा हे करीत आहेत.

Updated : 14 May 2022 4:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top