शहरातील मोहता चौक येथील 'प्रेमाचा चहा' येथे पुन्हा एका व्यावसायिकास सळाखीने तसेच प्राणघातक शस्त्राने हल्ला
Another businessman attacked with 'Love Tea' at Mohta Chowk in the city
हिंगणघाट प्रतिनिधी,दि.५
शहरात गुन्हेगारीच्या घटनांमधे सतत वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे.
शहरातील मोहता चौक येथील 'प्रेमाचा चहा' येथे पुन्हा एका व्यावसायिकास सळाखीने तसेच प्राणघातक शस्त्राने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी ७.३० वाजताचे दरम्यान घडली.
याप्रकरणी प्रेमाच्या चहाचे संचालक संतोष गौतम(ठाकुर) पितापुत्रासह एका आरोपीस अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार संतोष ठाकुर यांचे स्थानिक पंजाब नेशनल बँक परिसरात एक दुकानाचा गाळा आहे,तो गाळा फिर्यादि मोटवानी यांना भाडयाने दिला आहे, आरोपी संतोष ठाकुर यांनी हा गाळा खाली करुन देण्यासाठी मोटवानी बंधुकडे तगादा लावला होता,दुकान रिकामे करुन देण्याचे कारणावरुन फिर्यादि इंद्रजीत प्रल्हाद मोटवाणी(४०) यास आरोपीने शिविगाळ केली,याचा जाब विचारण्यासाठी ठाकुर यांचे 'प्रेमाचा चहा' येथे गेलेल्या फिर्यादि इंद्रजीत मोटवानी व सहकाऱ्यावरच ठाकुर पितापुत्रानी रॉडसारख्या प्राणघातक हत्याराने हल्ला चढविला.
सदर घटनेची तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी आरोपी विक्रम ठाकुर,संतोष ठाकुर व त्यांचा एक साथीदार अफसरखान पठान यास ताब्यात घेतले असून कलम ३०७,२९४,३४ भादंवीनुसार गुन्हा नोंद केला.
शहरात गुंडाराज सतत डोके वर काढत असून पोलिसांचा वचक दिसुन येत नसल्याने त्यांचे फावत आहे,शहरात अलीकडे अशा घटना सतत होत असून सामान्य माणसाला जीवन जगणे कठिण झाल्याचे दिसुन येत आहे.