Home > Crime news > थार येथे चोरी ,2 लाख रुपयांचा ऐवज लंपास गुन्हा दाखल

थार येथे चोरी ,2 लाख रुपयांचा ऐवज लंपास गुन्हा दाखल

An unidentified thief stole goods worth Rs 2 lakh

थार येथे चोरी ,2 लाख रुपयांचा ऐवज लंपास गुन्हा दाखल
X


मेहकर : रात्रीच्या वेळी घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने 2 लाख रुपयांचे माल लंपास केल्याची घटना मेहकर तालुक्यातील थार 11 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली गोपाल चंद्रशेखर सुळकर वय ३४ रा .थार (ह .मु. शेगाव ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कि,

थार येथील घरातील लोक झोपलेले असताना रात्री ३ वाजेच्या दरम्यान गोपाल सुळकर व अमोल यास जाग आली असता त्याला बेड रूम मधील लोखंडी कपाट उघडे दिसले तसेच कपाटातील पर्स बॅग सोन्याचे दागिने ठेवलेला स्टीलचा डब्बा असे घराच्या मागच्या स्वयंपाक खोलीत पडलेले दिसले. तसेच घराच्या मागील दरवाजा

उघडलेला दिसला . अमोल याने घरातील सर्वांना उठवले त्यावेळी अमोलसह घरातील लोकांनी पाहणी केली असता बेड रूम मधील लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी 20 हजार रुपये. मोहन माळ १,१०,४५० जोडमणी ३०,३८० रु ,गहुमणी ३४,७९२ रु व नगदी २५ हजार रुपये ,दोन

छत्री २००रुपये असा एकुण २,००,७९२ रू माल व दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असुन तशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी खारडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे सह इरशाद पटेल.अमोल बोर्डे . अनंत कळमकर तपास करीत आहेत.

Updated : 11 July 2021 2:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top