Home > Crime news > मोबाइल चोरी करणारा आणि विकत घेणारे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे ताब्यात

मोबाइल चोरी करणारा आणि विकत घेणारे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे ताब्यात

Amravati Grameen, a local crime branch, is in charge of mobile theft and buying

मोबाइल चोरी करणारा आणि विकत घेणारे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे ताब्यात
X

जिल्हा : अमरावती

प्रतिनधी.उज्वल चौधरी

पोलीस स्टेशन कुऱ्हा येथे फिर्यादी नामे "आकाश उत्तमसिंग ठाकूर रा.कुऱ्हा" यांनी तक्रार दिली की, दि. 18/01/2020 रोजी मध्यरात्री दरम्यान,

१) सॅमसंग गॅलेक्सी ए6 कंपनीचा मोबाइल किंमत 26600/ - आणि

२) विवो Y53 कंपनीचा मोबाइल किमंत रुपये 8000 / - रुपये आसा एकुन, 33,600 / - रु. रु चे मोबाईल रात्री चार्जिंगला लाऊन झोपले असता कोणीतरी अज्ञात ईसमाने घरातून चोरून नेला. वरुन दि. 19/01/2021 रोजी पो.स्टे. कुऱ्हा अप.क्र. 05/2020 कलम 380 भादंवीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. व सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे PSI विजय गराड व पोलीस अंमलदार करीत होते.

आज दिनांक 01/06/2021 रोजी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना पोलिस स्टेशन सायबर सेल, अमरावती ग्रामीण कडुन मिळालेल्या तांत्रिक महितीवरुन व वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही, नमुद पंच आणि पोलिस स्टॉपसह मिळालेल्या माहितीनुसार मेहकर जि. बुलढाणा येथे रवाना होऊन यातील

आ.क्र. 1)वसीम गंगा चौधरी वय 23 वर्ष रा. गवळीपुरा, कारंजा जि. वाशीम याने सदर गुन्ह्यातील मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न होवून सदर मोबाईल हा त्याचे परिचित असलेले आरोपी

क्र. 2) शेख रेहान शेख उस्मान वय 23 रा. दिवानी कोर्टाचे मागे मेहकर व,

आ. क्र. 3) शेख जब्बार शेख यासीन वय 34रा. मिलिंद नगर, मेहकर यांना विक्री केले व आ. क्र. 2) व 3) यांनी सदर गुन्ह्यातील चोरीचज मोबाईल कोणतीही खात्री न करता विकत घेतले. वरुन वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे कडुन गुन्ह्यातील

१) सॅमसंग गॅलेक्सी ए6 कंपनीचा मोबाइल किंमत 26600/ - आणि

२) विवो Y53 कंपनीचा मोबाइल किमंत रुपये 8००० / - रुपये असा एकुन, 33,600 / - रु. चा मुद्देमाल हस्तगत करुन तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सदर गुन्हा उघडकीस आणला. वरुन तिन्ही आरोपी व हस्तगत मुद्देमालसह पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. कुऱ्हा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा.पोलिस अधिक्षक डॉ.श्री हरी बालाजी एन., अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्री. श्याम घुगे, पोलीस निरीक्षक, श्री. तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली PSI विजय गरड, ASI मूलचंद भांबूरकर, HC सुनील केवतकर, NPC संतोष तेलंग, NPC बनवंत दाभाणे, NPC मंगेश लकडे, सायबर सेलचे PC गुणवंत शिरसाठ, सागर धापड, सिद्धार्थ इंगळे, रितेश वानखेडे, LPC सरिता चौधरी यांनी केली आहे.

Updated : 2 Jun 2021 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top