अॅम्बुलन्सद्वारे गुटखा तस्करीचा पर्दाफाश
Ambulance exposes gutka smuggling
X
यवतमाळवरुन आर्णीकडे गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलन्सला यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अडवून तस्करीचा पर्दाफाश केला. या अॅम्बुलन्सवर सिध्दु जाधव व त्याचा मोबाईल क्रमांक लिहीलेला असून अॅम्बुलन्सचा वाहन क्र. एमएच २९ टी ३२५६ असा आहे. जप्त केलेल्या मालामध्ये बाबुगोल्ड ६६६ चे या सुगंधित तंबाखूचे चार पोते आढळून आले. पोलिसांनी वाहनातील अनिल दुहुडकर २३, प्रदिप राठोड २७, सय्यद रहेमान सय्यद उमर २४ सर्व रा. आर्णी यांना ताब्यात घेतले आहे. रुग्णांची ने-आण करण्यासाठी एव्हाणा अंबुलन्सचा वापर केल्या जातो व तसा परवाणा परिवहन विभागाकडून त्यांना दिला जातो. मात्र आजकाल अॅम्बुलन्स सारख्या वाहनांचा वापर तस्कर दारु, गुटखा गुटखा, गांजा व सुगंधित तंबाखूच्या तस्करीसाठी करित असल्याचे पोलिसांच्या या कारवाईवरुन उघडकीस आले आहे. आज उघडकीस आले आहे. आज नागपूरवरुन यवतमाळमार्गे एका अॅम्बुलन्सने आर्णीकडे गुटखा तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली. ठाणेदार ग्रामीणच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ग्रामीणच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आर्णी मार्गावरील यवतमाळ लगत किन्ही ते जगदंबा ते इंजिनिअरींग कॉलेजच्या मधोमध सदर अॅम्बुलन्स अडवून त्या वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये चारपोते सुगंधीत तंबाखूने भरलेले आढळून आले. वाहनात असलेल्या तिघांना त्यांची नावे विचारली असता अनिल दुहुडकर, प्रदिप राठोड, सय्यद रहेमान सय्यद उमर सर्व रा. आर्णी असे सांगितले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन प्रतिबंधीत वस्तु कायद्यांन्वये त्यांच्यावर कारवाई करुन वाहनासह त्यांना ताब्यात घेतले आहे. यात पोलिसांनी २ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक किशोर जुनघरे, जमादार संदिप मेहेत्रे, रुपेश निवारे, जांभुळकर यांनी पार पाडली.