Home > Crime news > अलर्ट (एसबीआय) खातेदार हॅकर्सच्या निशाण्यावर❗तुम्हाला आलाय का 'हा' मेसेज❓

अलर्ट (एसबीआय) खातेदार हॅकर्सच्या निशाण्यावर❗तुम्हाला आलाय का 'हा' मेसेज❓

Alert (SBI) Accountant Hackers


हॅकिंगची प्रकरणे सध्या शिगेला पोहोचली असून गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. एसबीआयच्या नावाने बनावट एसएमएस सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या सरकारी एजन्सीने खातेधारकांना सतर्क केले आहे. 'प्रिय ग्राहक, तुमच्या कागदपत्रांची मुदत संपली असून, एसबीआय खाते ब्लॉक होईल. अकाउंट सुरू करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा', असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

एसबीआय खातेधारकांनी अशा एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा मेसेज आल्यास त्वरित डिलिट करावा, असे आवाहन बँकेकडून आणि पीआयबीकडूनही करण्यात आले आहे. असा मेसेज किंवा ई-मेल बँकेकडून कोणत्याही खातेदाराला पाठवला नसल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.

कुठे कराल तक्रार❓

वैयक्तिक आणि बँकिंग माहिती विचारणाया कोणत्याही बनावट एसएमएस/ई-मेलला

प्रतिसाद देऊ नका व जर तुम्हाला असे मेसेज आले तर लगेच report.phishingasbi.co.in वर मेल करुन कळवा, असे आवाहन केले आहे.

☎️ - १९३० या सायबर क्राइम हेल्पलाइनवर खातेधारक फोन करूनही माहिती देऊ शकतात.

🔹अशा मेसेजमुळे तुमचा डेटा लिक होण्याची शक्यता असते.

🔸 सायबर भामटे तुमचा डेटा चोरुन त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

Updated : 26 May 2022 9:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top