Home > Crime news > Akola Murder भावाने केली बहिणीची धारदार चाकूने गळा चिरून हत्या

Akola Murder भावाने केली बहिणीची धारदार चाकूने गळा चिरून हत्या

पोलिसांनी केली तरूणाला अटक, पुढील तपास सुरू

Akola Murder भावाने केली बहिणीची धारदार चाकूने गळा चिरून हत्या
X

अकोला शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत केशवनगर भागात राहणाऱ्या 19 वर्षीय नेहा नंदनलाल यादव या मुलीचा तिच्या भावाने धारदार चाकूने हत्या केल्यानं खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास या मुलीच्या आतेभावाने नेहाला आपल्या मोबाईलचा रिचार्ज संपल्यामुळे वाय-फाय मागितलं होतं आणि सोबतच हेडफोन मागितले होते. मात्र नेहाने वायफायचा पासवर्ड सांगितला नाही तसंच हेडफोनही दिले नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर बॉबीने नेहाचा चाकूने गळा चिरला. या घटनेत नेहा जखमी झाली.

या घटनेची माहिती मिळताच नेहाच्या वडिलांनी तिला तातडीने अकोला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र तिथे दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने या मुलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार व सिटी डीवायएसपी सचिन कदम व इनव्हेस्टिगेशन कार घटनास्थळी गेली व त्या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मारेकरी 24 वर्षीय ऋषिकेश उर्फ़ बॉबी राममोहन यादव हा घरातच असल्याने पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं व या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवायचं काम सुरू असून पोलिसांनी माध्यमांना प्राथमिक दृष्ट्या माहिती हेडफोन व वायफाय मागण्या तरुणीची हत्या झाली असं सांगितलं आहे. असं असलं तरीही या प्रकरणातलं नेमकं गूढ काय हे ते अद्याप समजू शकलेलं नाही. वरवर पाहता वायफाय आणि हेडफोनवरून भांडण आणि त्यातून झालेली हत्या असं जरी दिसत असलं तरीही दुसरा काही हेतू या हत्येमागे होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलीस या प्रकरणातले सगळे अँगल तपासत असल्याचं ठाणेदार देवराज खंडेराव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

Updated : 17 July 2021 10:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top