स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
१देशी कट्टा, व 5 जिवंत काडतुस सह एक आरोपी अटक!
X
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
१देशी कट्टा, व 5 जिवंत काडतुस सह एक आरोपी अटक!
जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले
पुसद शहराचा दिवणसेदिवस वाढत्या गुन्हेगारी चा आलेख बघता आता पुसद पोलिसांनी जागोजागी कसून तपासणी व चौकशीची सुरु केली आहे . सविस्तर माहिती अशी की पुसद शहरालगत असलेल्या लक्ष्मीनगर-मंगलमूर्ती नगर येथील भागात,दोन इसम देशी कट्टा सह जिवंत काडतूस विक्रीकरण्यासाठी चारचाकी वाहनांने येणार अ सल्याची गुप्त माहिती आधारे स्तानिक गुन्हे शाखा यांनी धडक कारवाई दी,१९ जुलै रोजी करण्यात आली आहे.
गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक सागर भारस्कर,व त्यांच्या पथकाने,आरोपी, राहुल साहू वय,४२ वर्ष, रा. ऋग्वेद कॉलनी पुसद, व संतोष पवार,यांच्याकडून संजय नगर येथे सायंकाळच्या सुमारास एक गावठी कट्टासह पाच जिवंत काडतूस, व नगदी रोख रक्कम ३० हजार रुपये तसेच चार चाकी डस्टर कंपनीची कार गाडी न. एम एच ४६ ए यु ९३७२ सहित मोबाईल असा एकूण तीन लाख एकेचालीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हे श्याखेने यू. एल. एम.३/२५ सस्त्र अधिनियम,१९५९ अंतर्गत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई,स्थानिक गुन्हेशाखेच्या उपनिरीक्षक सागर भारसकर,,ईपीआय राजू खांदवे,पोलिस हेडकॉन्स्टबल उल्हास कुरकुट्टे,पोलिस नाईक पंकज पातूर्कर पोलिस कॉन्स्टेबल मोहमद ताज,चालक,अमित कुंभारे,यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ (पाटील) अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक खंडेराव धरने,पुसद पोलिस उपविभागीय अधिकारी आडे साहेब, पुसद शहराचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, PI परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे.