Home > Crime news > १५ दिवसांत ११ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई : ०८ तलवारी व ०४ खंजीर जप्त

१५ दिवसांत ११ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई : ०८ तलवारी व ०४ खंजीर जप्त

Action against 11 persons under Arms Act in 15 days: 08 swords and 04 daggers seized

१५ दिवसांत ११ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई : ०८ तलवारी व ०४ खंजीर जप्त
X

१५ दिवसांत ११ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई : ०८ तलवारी व ०४ खंजीर जप्त

वाशिम:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गेल्या १५ दिवसांमध्ये विनापरवाना घातक धारदार शस्त्र बाळगत समाजामध्ये धाक, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकूण ११ जणांविरुद्ध कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सह विविध सहकलमां अन्वये कारवाई करण्यात आली आहे.


दि.२८.०६.२०२२ रोजी ०१) पो.स्टे. रिसोड हद्दीतील पंचशील नगर येथील एका २७ वर्षीय युवकाजवळून धारदार चाकू मिळून आल्याने त्यावर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १४२ म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली. ०२) पो.स्टे. मंगरूळपीर हद्दीतील मंगलधाम येथील एका ४९ वर्षीय ईसमाकडे एक लोखंडी धातूची धारदार तलवार मिळून आल्याने त्यास ताब्यात घेत त्याच्यावर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १३५ म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली असून तलवार जप्त करण्यात आली आहे. ०३) पो.स्टे. मंगरूळपीर हद्दीतीलच महात्मा फुले चौकातून नवीन सोनखास येथील एका २४ वर्षीय युवकाकडून एक लोखंडी धातूची धारदार तलवार स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी जप्त केली असून त्याच्यावर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १३५ म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसातील शस्त्र अधिनियमांन्वये करण्यात आलेली ही अकरावी कारवाई असून त्यामध्ये एकूण ०८ तलवारी व ०४ खंजीर / चाकू जप्त करण्यात आले.

आहेत. वर्षभरात पो.स्टे. रिसोड येथे ०५, पो.स्टे. अनसिंग येथे ०१, पो.स्टे. मानोरा येथे ०२,पो.स्टे. वाशिम शहर येथे ०५, पो.स्टे. कारंजा शहर येथे ०३, पो.स्टे. मंगरूळपीर येथे ०२ कारवाया अशा एकूण १८ कारवाया शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाया करण्यात आल्या आहेत.

सदरच्या कारवाया मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक व पो.स्टे. मंगरूळपीर व पो.स्टे. रिसोड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडल्या. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 29 Jun 2022 8:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top