45 लाखाच्या दरोड्यातील आरोपीस राजस्थान मधून अटक
Accused of robbery of Rs 45 lakh arrested from Rajasthan
X
45 लाखाच्या दरोड्यातील आरोपीस राजस्थान मधून अटक
वणी: 20 मार्च 2021 रोजी भरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याकडून 45 लाख रुपयांची बॅग हिसकावून पळालेल्या दरोडेखोरांपैकी एका आरोपीला वणी पोलिसांनी बुधवारी राजस्थान येथून अटक केली.
ओमप्रकाश चेनाराम बिश्नोड असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून राजस्थान पोलिस दप्तरी हिस्ट्रीशीटर म्हणून त्याची नोंद आहे.
आरोपीला अटक करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यातील पथकाने जोधपूर पोलिसांच्या सहकार्याने ऑपरेशन राबविले. वणी पोलीस स्टेशन मधील एपीआय संदीप ऐकाडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक दरोडेखोरांच्या शोधात राजस्थान पाठविण्यात आले. राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यातील एकलखोर गावातून त्याच्या राहत्या घरुन बुधवार 15 डिसेंम्बर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान आरोपी ओमप्रकाश याला अत्यन्त शिताफीने ताब्यात घेण्यात आले.